‘माझी मुलं गे किंवा ले’स बि’यन…’ बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीचे मुलांच्या बाबतीत केले धक्कादायक विधान…

By Viraltm Team

Published on:

छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शमा सिकंदरने काही दिवसांपूर्वीच आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं आहे. १८ मार्च २०२२ रोजी ती जेम्स मिलिरॉनसोबत गोव्यात लग्नबंधनामध्ये अडकली. लग्नानंतर शमाने आपल्या नवीन वैवाहिक आयुष्यातील मुलांबद्दल बोलताना एक मोठे वक्तव्य केले आहे.

शमा पुढे म्हणाली कि लग्नानंतर तिच्या आयुष्यामध्ये फार मोठा बदल झालेला नाही. पण मुलांविषयी तिने जे सांगितले ते अजूनपर्यंत कोणीच म्हंटलेले ऐकले नसेल. शमा म्हणाली लग्नानंतर माझ्या आयुष्यामध्ये फार मोठा बदल झालेला नाही. कारण आम्ही जवळ जवळ ८ वर्षे एकत्र राहत होतो.

पण एक छोटा बदल नक्कीच जाणवला. ज्यावेळी आम्ही लग्न करत होतो तेव्हा लग्नाच्या विधी दरम्यान एक सकारात्मकतेची उर्जा मिळाली. दोन व्यक्ती जेव्हा मनापासून प्रेम करत एकत्र येतात तेव्हा त्यांच्यासोबत भोवतालचे जग देखील बदलते.

ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्यासोबत लग्न करणे हा एक खूपच मोठा आनंद असतो. कोरोनामुळे लग्न २ वर्षे उशिरा केले. पण जे काही झाले ते आमच्या भल्यासाठीच झाले. त्यामुळे एक एकमेकांना चांगले ओळखू शकलो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shama Sikander (@shamasikander)

शमा पुढे म्हणाली, मी एक खूप चांगली आई बनायचा प्रयत्न करेन. एका मुलाखती दरम्यान शमाने हे देखील सांगितले होते कि आई बनण्यासाठी तिला लग्न करण्याची गरज नाही. पण मुल जन्माला घालणे खूप मोठी जबाबदारी असते. तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये सेटल होणे गरजेचे आहे. जेणेकरून मुलांचा सांभाळ चांगल्या प्रकारे होतो.

पुढे शमा जे काही म्हणाली त्यामुळे तुमच्या भुवया नक्कीच उंचावतील. ती म्हणाली कि, मला मुलगा होवो किंवा मुलगी होवो, मुलं गे असोत किंवा ले’स बि’यन मला त्याचे काही घेणेदेणे नाही. मला मुलं पाहिजेत पण त्यांना कधी जन्माला घालायचं हे आमच सिक्रेट आहे.

Leave a Comment