Qries

नीतू चंद्रा २०११ मध्ये कुछ लव जैसा चित्रपटामध्ये शेवटची पाहायला मिळाली होती. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत राहुल बोस देखील मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळाला होता. यानंतर नीतूने चित्रपटामध्ये देखील आपले नशीब आजमावले.

तिथे देखील ती अपयशी ठरल्यानंतर तिने साऊथ चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला. गेल्या वर्षी तिने खामोशी चित्रपटामधून डेब्यू केला आणि रीवोल्ट चित्रपटामध्ये देखील दिसली होती. नुकतेच नीतूने आपला वाढदिवस साजरा केला आहे.

२००५ मध्ये ती अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमच्या गरम मसाला चित्रपटामध्ये देखील दिसली होती. मधुर भांडारकर चर्चित चित्रपट ट्राफिक सिग्नलची हिरोईन म्हणून तिला जास्त ओळखले जाते. नीतू चंद्राच्या बॉलीवूड करियरमध्ये सर्वात जास्त हंगामा तेव्हा झाला जेव्हा तिने २००९ मध्ये ले स’बि’यन फोटोशूट केले होते.

पुरुषांच्या एका मासिकासाठी नीतूने कृशिका गुप्तासोबत ले स’बि’यन फोटोशूट केले होते. या फोटोंमध्ये ती मॉडेलसोबत का म’सू’त्रच्या मुद्रांमध्ये होती. लोकांना हे मुळीच आवडले नाही. या फोटोशूटमुळे खूप वाद देखील झाले होते. शेवटी नीतूला पोलिसांचे संरक्षण मागावे लागले.

या फोटोशूटवर बोलताना नीतू म्हणाली होती कि मी एक बिहारी मुलगी आहे. मी दुसऱ्या मॉडेलला कीस केले नाही किंवा आमची बॉडी एकमेकांना टच करत नव्हती. २०१० मध्ये नीतूचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आले जेव्हा क्रिकेट सामन्यांचा फिक्सिंग मुद्दा समोर आला होता.

इतकेच नाही तर पाकिस्तानी क्रिकेटर मोहम्मद आसिफसोबत देखील तिचे नाव जोडले गेले. स्कॉटलंड यार्डने हा दावा केला कि नीतूने या क्रिकेटरला फक्त फोनच केले नाहीत तर काही संदेश देखील पाठवले. नीतू चंद्रा यावर म्हणाली कि हे चुकीचे आहे मी मोहम्मद आसिफला ओळखत नाही.

साऊथ इंडस्ट्रीमध्ये देखील नीतू वादामध्ये राहिली. जेव्हा ती म्हणाली होती कि तिने तेलगु इंडस्ट्रीमध्ये काम करणे सोडून दिले आहे. तिने आपल्या ब्लॉग मध्ये लिहिले कि सत्यमेव जयते चित्रपटादरम्यान तिचा अनुभव खूप वाईट राहिला. यामधील हिरो सेटवर दा रु पिऊन येत असत. मला खूप भीती वाटायची. पण जेव्हा मी त्यांच्याविरुद्ध आवाज उठवू लागली तेव्हा त्यांनी हि कमेंट डिलीट करून टाकली.