टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेता करण मेहरा पुन्हा एकदा चर्चेमध्ये आला आहे. वास्तविक गेल्या वर्षी निशा रावलने करण मेहरावर अनेक आरोप लावले होते. त्यानंतर करणला जेलची हवा देखील खावी लागली होती. अनेक दिवस हा वाद सूरु होता, तथापि शेवटी निशा रावल आपला मुलगा कवीशला घेऊन वेगळे राहू लागली.

आता यादरम्यान करण मेहराने पुन्हा एकदा पत्नी निशा रावलला एक्स्पोज केले आहे. करणचे म्हणणे आहे कि निशा आपल्या लवरसोबत त्या घरामध्ये राहत आहे जिथे तो आणि निशा राहत होते. फक्त हेच नाही तर मुलगा कवीश देखील त्यांच्यासोबत तिथे राहतो.

यासोबत करणने निशावर प्रश्न उपस्थित करताना म्हंटले आहे कि कवीशसोबत अशाप्रकारे त्या व्यक्तीसोबत राहणे शंका करण्यासारखी गोष्ट आहे. याशिवाय करणने मिडियामध्ये पत्नी निशा रावलला एक्स्पोज करताना म्हंटले आहे कि निशा कोणीतरी रोहित साटिया नावाच्या व्यक्तीला डेट करत आहे. अनेक दिवस तो आमच्यासोबत होता.

त्याने मला निशाचा मानलेला भाऊ म्हणून परिचय दिला होता आणि त्याचे म्हणणे होते कि निशाचे कन्यादान देखील त्यानेच केले होते. मला समजत नव्हते कि हे सर्व काय होत आहे. तो त्याच घरामध्ये राहतो ज्यामध्ये निशा आणि माझा मुलगा राहतात. हि गोष्ट अनेक प्रकारे मॉरली शंका घेण्यासारखी आहे.

यासोबत करण मेहराने हे देखील सांगितले कि त्याला आणि त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. ते कोण लोक आहेत जे मला त्रास देत आहेत ते माहित नाही. ईमेल द्वारे करणने याची माहिती ऑफिशियल्सला दिली आहे. त्याचबरोबर कम्प्लेंट देखील दाखल केली आहे. याशिवाय करण अनेक फोन कॉल्स देखील इग्नोर करत आहे, ज्यावर नंबर येत नाही. त्याने सांगितले कि एक दिवस तो झोपला होता. फोनमध्ये जेव्हा नंबर न पाहता त्याने फोन उचलला तेव्हा त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली. याशिवाय त्याचे आईवडील, भाऊ कुणालला देखील धमकी देण्यात आली.

गेल्या वर्षी निशा रावलने करण मेहरा सोबत आपले भांडण पब्लिक केले होते आणि करण मेहरावर निशाने आरोप लावले होते कि त्याचे कोणासोबत तर अफेयर चालू आहे. याशिवाय तो नेहमी शुटींगचे निमित्त सांगून त्या मुलीला भेटायला जातो. याशिवाय निशा रावलने करण मेहरावर घरेलू हिंसाचा देखील आरोप लावला होता.