एके काळच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असलेल्या मंदाकिनीने आपल्या अभिनयाने लोकांना वेड लावले होते. मंदाकिनीचे फिल्मी करियर फार काळ टिकले नाही आणि ती फिल्म इंडस्ट्रीपासून दूर झाली. राम तेरी गंगा मैली चित्रपटामधून तिने आपल्या अभिनयाची अशी जादू केली कि तिला अजून देखील लोक विसरू शकलेले नाहीत.
अभिनेत्री मंदाकिनीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले पण राम तेरी गंगा मैली या चित्रपटामुळेच तिला सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली. वयाच्या १६ व्या वर्षीच मंदाकिनीला अपार प्रसिद्धी मिळाली होती. राम तेरी गंगा मैली चित्रपटामधील तिच्या बो’ल्ड सीनमुळे तिची एक बो’ल्ड अभिनेत्री म्हणून ओळख बनली होती.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ती रातोरात स्टार बनली होती. पण जितक्या वेगाने तिला प्रसिद्धी मिळाली तितक्याच वेगाने तिचे फिल्मी करियर संपुष्टात आले. मंदाकिनीने फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी आपले नाव बदलले होते.
मंदाकिनीचे खरे नाव यास्मिन जोसेफ असे होते तिचा जन्म उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे झाला होता. राम तेरी गंगा मैली या चित्रपटामध्ये काम करण्यापूर्वी तिने तीन चित्रपट नाकारले होते असे म्हंटले जाते. त्यावेळी ती एक अभिनेत्री म्हणून नव्हे तर मोस्ट वॉन्टेड गँ ग’स्टर दा’ऊ’द इ’ब्रा’हिमची गर्लफ्रेंड म्हणून प्रसिद्ध होती.
१९८५ मध्ये मेरा साथी चित्रपटामधून तिने बॉलीवूडमध्ये एंट्री केली होती. पण आपल्या बो ल्ड’नेसने सर्वाना वेड लावणाऱ्या अभिनेत्री मंदाकिनीचे नाव कधीच प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये येऊ शकले नाही. २२ वर्षांची असताना तिला राम तेरी गंगा मैली चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली.
या चित्रपटामध्ये तिने जबरदस्त बो’ल्ड सीन दिले होते. मंदाकिनीने आपल्या फिल्मी करियरमध्ये आग और शोला, अपने अपने, प्यार करे देखो, हवालत, नया कानून, दुश्मन सारख्या चित्रपटांमध्ये काम केले परंतु तिचे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे कमाल दाखवू शकले नाहीत. १९९६ मध्ये ती जोरदार चित्रपटामध्ये शेवटची पाहायला मिळाली होती. १९९० मध्ये अभिनेत्रीने लग्न केले. तिला सध्या राबिल आणि इनाया नावाची दोन मुले आहेत.