होय आम्ही त्याच जीविधा शर्माबद्दल बोलत आहोत चित्रपटामध्ये जिच्या ओठांच्या खाली तीळ पाहायला मिळाले होते. चित्रपटामध्ये तिने आपल्या एक्सप्रेशन आणि अभिनयाने सर्वांना वेड लावले होते. तिने चित्रपटामध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका केली होती. याच चित्रपटामधून जीविधाने आपल्या करियरची सुरुवात केली होती. पण हळू हळू ती फिल्म इंडस्ट्रीमधून गायब झाली. या २० वर्षांमध्ये तिचा लुक खूपच बदलला आहे.

जीविधा भलेहि चित्रपटांमध्ये दिसत नाही पण ती सोशल मिडियावर नेहमी सक्रीय राहते. तिचे इंस्टाग्राम अकाऊंट आहे जिथे ती स्वतःसंबंधी पोस्ट शेयर करत असते. अशामध्ये जर तिचे आताचे फोटो पाहिले तर तिच्या ग्लॅमरस फोटोंमध्ये तिला ओळखणे देखील कठीण आहे.

जीविधाने बॉलीवूडमध्ये ये दिल आशिकाना आणि ताल सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. ताल चित्रपटामध्ये तिने ऐश्वर्या राय बच्चनच्या बहिणीची भूमिका केली होती. पण यानंतर असे सांगितले जाते कि तिला हिंदी चित्रपटांमध्ये चांगल्या ऑफर्स मिळाल्या नाहीत म्हणून तिने साउथ फिल्म इंडस्ट्रीकडे आपला मोर्चा वळवला.

जिविधाने युवारत्ना या तेलगु चित्रपटामध्ये काम केले होते. यानंतर ती पंजाबी चित्रपटांमध्ये देखील दिसली होती. तिने गुरदास मानसोबत मिनी पंजाब चित्रपटामधून पंजाबी फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता. तिने यार अनमुले, दिल ले गई कुड़ी पंजाब दी, लायन ऑफ पंजाब आणि दिल साड्डा लुटिया गया सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते.

जिविधा शर्माने फक्त वेगवेगळ्या भाषांच्या चित्रपटांमध्येच नाही तर टीव्ही शोमध्ये देखील काम केले.ती तुम बिन जाऊं आणि जमीन से आसमां तक सारख्या सिरियल्समध्ये काम करताना दिसली होती. याशिवाय तिने सावधान इंडिया आणि फीयर फाइल्स सारख्या शोमध्ये छोटे मोठे रोल्स देखील केले होते.

जीविधा ऋतिक रोशनच्या मोहनजोदाड़ो चित्रपटामध्ये शेवटची पाहायला मिळाली होती. ती भलेही चित्रपटांमध्ये सक्रीय नाही पण सोशल मिडियावर ती नेहमी सक्रीय राहते. ती इंस्टाग्रामवर आपले सुंदर फोटोज शेयर करत असते. तिच्या इंस्टाग्रामवर ४० हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.