‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी हलणार दुसऱ्यांदा पाळणा, ४ महिन्यांपूर्वीच दिला होता मुलीला जन्म…

By Viraltm Team

Published on:

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देबिना बनर्जीसाठी आनंदाचा क्षण आहे, कारण अभिनेत्री पुन्हा एकदा आई होणार आहे. नुकतेच अभिनेत्रीने एका मुलीला जन्म दिला होता आणि आता पुन्हा अभिनेत्रीने आपल्या प्रेग्नंसीची घोषणा करून चाहत्यांसोबत सर्वांनाच हैराण केले आहे.

देबिना बनर्जीने सोशल मिडियावर एक पोस्ट शेयर करून आई होणार असल्याची घोषणा केली आहे. ज्यानंतर तिचे चाहते हैराण झाले आहेत. हि प्रेग्नंसी नियोजित नव्हती, पण अभिनेत्री आता खूपच आनंदी आहे, कारण तिचे कुटुंब आता पूर्ण होणार आहे.

देबिना बनर्जीने १६ ऑगस्ट २०२२ रोजी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेयर केली आहे. फोटोमध्ये देबिना, तिचा पती गुरमीत चौधरी आणि तिची चार महिन्याची मुलगी लियाना चौधरी पाहायला मिळत आहे. गुरमीत चौधरीने पत्नीलाला मिठीत घेतले आहे आणि मुलीला कडेवर घेतले आहे. यादरम्यान अभिनेत्री आपल्या सोनोग्राफीचा रिपोर्ट फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तिघेही व्हाइट ड्रेसमध्ये ट्विनिंग करताना दिसत आहेत.

हि पोस्ट शेयर करताना देबिना बनर्जीने खुलासा केला आहे कि, ती पुन्हा आई होणार आहे, अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, काही निर्णय हे वरचा घेत असतो, आणि त्याला कोणीही बदलू शकत नाही. हा एक आशीर्वाद आहे. आम्हाला पूर्ण करण्यासाठी लवकरच येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Debina Bonnerjee (@debinabon)

यासोबत देबिनाने हॅशटॅग बेबी नंबर २, पुन्हा आई, प्रेग्नंसी डायरीज, डॅडी अगेन असे हॅशटॅग वापरले आहेत. सेलिब्रिटीजपासून चाहत्यांपर्यंत सर्वजण अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्री देबिना बनर्जी अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर सरोगसीद्वारे आई बनली होती आणि ३ एप्रिल २०२२ रोजी एका मुलगी लीयानाला जन्म दिला होता. टीव्ही अभिनेत्रीने अनेकवेळा आपल्या प्रेग्नंसीची जर्नी जगासमोर सांगितली आहे, तिला प्रेग्नंट होण्यासाठी अनेक प्रक्रियांमधून जावे लागले होते. असो देबिना आणि गुरमीत पुन्हा एकदा आईवडील बनणार आहे ज्यासाठी ते खूपच उत्सुक आहेत.

Leave a Comment