आईच्या जीवावर इंडस्ट्रीमध्ये करोडो रुपये कमवतात ‘या’ अभिनेत्री, पहा असे काय काय केले आईने यांच्यासाठी…

By Viraltm Team

Published on:

आईसाठी त्यांची मुले सर्वकाही असतात. ती लहानपणापासूनच त्यांना बरेच काही शिकवते जेणेकरून मोठे झाल्यानंतर ते स्वतःच्या पायावर उभे राहतील. अशामध्ये आज आपण बॉलीवूडमधील अशा अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्यासाठी त्यांची आईच सर्वकाही होती. त्यांच्याकडूनच त्यांनी अभिनयाचे धडे घेतले आणि आज इंडस्ट्रीमध्ये करोडो रुपये कमवत आहेत.

तनुजा आणि काजल: तनुजा ६० आणि ७० च्या दशकामधील प्रसिद्ध अभिनेत्री होती. यादरम्यान तिने राह, हाथी मेरे साथी, आग सारखे सुपरहिट चित्रपट केले. तर तिची मुलगी काजोलने ९० च्या दशकामध्ये प्रसिद्धी मिळवली. काजोलने देखील दुल्हनिया ले जाएंगे, बाजीगर, फना, कुछ-कुछ होता है, करण अर्जुन सारखे सुपरहिट चित्रपट दिले. तथापि तनुजाची लहान मुलगी तनिशा फिल्म इंडस्ट्रीमध्ये खास काही करू शकली नाही.

बबीता आणि करिश्मा-करीना: रणधीर कपूरची पत्नी आणि एके काळची प्रसिद्ध अभिनेत्री बबीता कपूरने ६० आणि ७० च्या दशकामध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. कल आज और कल, बनफूल, हसीना मान जाएगी सारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केले. बबीताने आपली अभिनयाची कला आपल्या दोन्ही मुलींना देखील शिकवली. करिश्माला तर तिने वयाच्या १६ व्या वर्षीच बॉलीवूडमध्ये काम मिळवून दिले होते. तेव्हा त्यांची आर्थिक स्थिती कमजोर होती. करिश्मा हिट होण्यात बबीताची महत्वाची भूमिका होती.

शर्मिला टैगोर आणि सोहा अली खान: शर्मिला टैगोरने ६० आणि ७० च्या दशकामध्ये अनेक हिट चित्रपट दिले. अराधना, अमर प्रेम, सफर, दाग, मालिक, चुपके चुपके हे तिचे काही खास चित्रपट राहिले. शर्मिलाच्या सौंदर्याबरोबरच तिच्या अभिनयाचे देखील कौतुक होते. तिचे हे गुण तिची मुलगी सोहा अली खान मध्ये देखील आले. तथापि सोहा बॉलीवूडमध्ये आपले नाव कमवू शकली नाही. पण तिने जितके देखील चित्रपट केले त्यासाठी तिचे खूप कौतुक झाले.

श्रीदेवी आणि जान्हवी कपूर: श्रीदेवीला कोणत्याही ओळखीची गरज नाही. ती बॉलीवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक होती. वयाची पन्नाशी पार होऊन देखील ती चित्रपटांमध्ये अॅक्टिव होती. पण तिचे आकस्मित निधन झाले. पण हे जग सोडून जाण्याआधी तिने आपली मुलगी जान्हवी कपूरला अभिनयाचे धडे दिले होते. जान्हवीने धडक चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. तिची लहान मुलगी ख़ुशी देखील लवकरच बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे.

अमृता सिंह आणि सारा अली खान: अमृता सिंह तिच्या काळामधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने मर्द, आईना, बेताब सारखे अनेक हिट चित्रपट दिले. घटस्फोटानंतर अमृताने एकट्यानेच साराची चांगली देखभाल केली तिला फिल्म इंडस्ट्री लायक बनवले. साराने केदारनाथ चित्रपटामधून डेब्यू केले होते. यानंतर तिने सिंबा, लव आजकल २ आणि कुली नंबर १, अतरंगी रे सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले. लोक तिला आईची कार्बन कॉपी देखील म्हणतात.

Leave a Comment