कधी कधी दिग्दर्शकांसाठी मला चहा, नाश्ता आणि सि’गा’रेट आणण्यास सांगितले जात असे, असा खुलासा बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम करणाऱ्या KGF चा अभिनेता यशने एका मुलाखतीदरम्यान उघड केले आहे.
यश पुढे म्हणाल कि अशी कामे करताना माझ्या मनाला खूप त्रास व्हायचा आणि मी स्वतःलाच प्रश्न विचारायचो कि असे काम करणे योग्य आहे का? पण काहीतरी करायचे होते, अपयशी व्हायचे नव्हते. अशाच वेळी काही लोक हार मानतात आणि घरी परततात.
पण मी सक्षमतेने उभा राहिले, कारण मला यश मिळवायचे होते. जेव्हा मी माझ्या सिनियर अभिनेत्यांसोबत जेवायला बसायचो तेव्हा ते मला वेगळ्याच नजरेने बघायचे. तेव्हा मला खूप वाईट वाटायचे.
KGF आणि KGF २ चित्रपटांनी अभिनेता यशला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले आहेत. KGF चित्रपटा कमाईचा रेकोर्ड मोडीत काढत आज KGF २ जगभरामध्ये कमाईचे नवीन रेकोर्ड बनवत चालला आहे. नुकतेच KGF च्या निर्मात्यांनी KGF चा तिसरा पार्ट बनवण्याचे जाहीर केले होते.
यामध्ये राणा दग्गुबत्ती यश सोबत पाहायल मिळणार आहे असे सांगितले जात आहे. २०२४ मध्ये या चित्रपटावर काम सुरु करणार असल्याने निर्मात्यांनी स्पष्ट केले. सध्या यश त्याच्या आगामी चित्रपटांच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.
KGF ३ चित्रपटाची स्टार कास्ट अजून फायनल केलेली नाही. अभिनेता यश जेव्हा शुटींगमधून फ्री होईल तेव्हा यावर विचार केला जाईल असे निर्माते यावेळी म्हणाले. सध्या अभिनेता यश माय नेम ईस कर्नाटका आणि शुभाशया या दोन चित्रपटांचामध्ये पाहायला मिळणार आहे जे सप्टेंबर २०२२ आणि डिसेंबर २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहेत.