पत्नी आणि मुलीसाठी इतक्या करोडची संपत्ती मागे सोडून गेले सतीश कौशिक…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडचे दिग्गज अभिनेता आणि आपल्या कॉमेडीने लोकांना हसायला भाग पडणारे सतीश कौशिक आता आपल्यामध्ये नाहीत. १३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणामध्ये जन्मलेले अभिएनेत सतीश कौशिक यांनी बुधवारी वयाच्या ६६ व्या वर्षी अंतिम श्वास घेतला. अनिल कपूरची मुख्य भूमिका असणारा मिस्टर इंडिया चित्रपटामध्ये कॅलेंडरची भूमिका साकारणारे सतीश कौशिक यांच्या पश्चात पत्नी शशी कौशिक आणि मुलगी वंशिका आहे ज्यांच्यासाठी त्यांनी करोडोंची संपत्ती मागे सोडली आहे.
सतीश कौशिक यांचे बालपण हरियाना आणि दिल्लीमध्ये गेले. १९७२ मध्ये दिल्लीच्या किरोड़ीमल कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा अँड फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये प्रवेश घेऊन अभिनय शिकला आणि यानंतर त्यांनी मुंबईचा रस्ता पकडला. आपल्या अभिनयाच्या बळावर त्यांनी मिस्टर इंडिया चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये एक वेगळी ओळख बनवली. सतीश कौशिकने फक्त चित्रपटांमध्ये अभिनयाद्वारेच कमाई केली नाही तर स्क्रीन रायटर, दिग्दर्शक आणि निर्माता बनून देखील बक्कळ कमाई केली. याशिवाय त्यांनी टीव्ही सिरीयलमध्ये देखील काम केले.

बॉलीवूडमध्ये दीर्घ काळ राज्य करणारे सतीश कौशिक यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. माहितीनुअस्र ते आपल्या पत्नी आणि मुलीसाठी जवळ जवळ १५ मिलियन डॉलरची संपत्ती मागे सोडून गेले. आपल्या ३५ वर्षाच्या करियरमध्ये त्यांनी मासूम मध्ये शेखर कपूरच्या सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. सतीश कौशिक यांनी जवळ जवळ १०० चित्रपटांमध्ये काम केले.
लोकांना हसवता हसवता त्यांनी आपल्या कुटुंबासाठी करोडो रुपयांची संपत्ती सोडली आहे. मुंबईमध्ये आलिशान घरासोबत सतीश कौशिकजवळ कार्सचे देखील खास कलेक्शन होते. माहितीनुसार त्यांच्या आवडत्या कार्समध्ये ऑडी देखील सामील होती. त्यांच्या कार्स कलेक्शनमध्ये ऑडी क्यू७, ऑडी क्यू३ सोबत एमजी हेक्टर सहित अनेक इतर कार्स आहेत.

Leave a Comment