कुटुंबासोबत जल्लोषात खेळली होळी, नंतर वाटू लागले अस्वस्थ, आला हृदयविकाराचा झटका, असे जग सोडून गेले सतीश कौशिक…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेता सतीश कौशिक आता आपल्यामध्ये नाहीत. होळीच्या खास प्रसंगी सतीश कौशिक यांनी जगाचा निरोप घेतला. ४ दशके बॉलीवूडमध्ये सक्रीय राहिलेल्या सतीश कौशिक यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले.
सतीश कौशिक सारख्या उत्कृष्ट कलाकाराच्या अशा जाण्याने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. बॉलीवूड सेलेब्स देखील शोक व्यक्त करत आहेत. सतीश कौशिक यांचे निधन हृदयविकाराचा झटक्यामुले ८ मार्च रोजी गुरुग्राम येथे झाले. याच्या एक दिवस अगोदर त्यांनी जल्लोषामध्ये होळी खेळली होती.
एक उत्कृष्ट अभिनेता असण्यासोबत ते एक दिग्दर्शक देखील होते. त्यांनी काही चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले होते. कौशिक यांचा जन्म हरियाणाच्या महेंद्रगढ़मध्ये १३ एप्रिल १९५६ रोजी झाला होता. दिल्लीमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अभिनय मध्ये करियर बनवण्याचा निश्चय केला आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मध्ये प्रवेश घेतला.
सतीश कौशिक यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मध्ये मध्ये अभिनय शिकल्यानंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता. १९८३ मध्ये त्यांचा बॉलीवूड डेब्यू झाला होता. यादरम्यान ते मासूम चित्रपटामध्ये दिसले होते. याच वर्षी त्यांचा मंडी हा आणखी एक चित्रपट रिलीज झाला होता.
सतीश कौशिकने मंदीमध्ये काम मिळवण्याचा एक मजेदार किस्सा कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये सांगितला होता. त्यावेळी त्यांना मुतखडा झाला होता. त्यांनी याचा इलाज केला आणि एक्स रे रिपोर्ट घेऊन आले. यादरम्यान फोनवर त्यांची बातचीत श्याम बेनेगलसोबत झाली. चित्रपटामध्ये काम देण्यासाठी श्यामने त्यांना एक फोटो मागितला.
सतीश यांना तेव्हा त्यांच्या दिसण्याबद्दल चिंता वाटायची. त्यांनी म्हणते कि श्याम बेनेगल यांनी मला फोनवर फोटो मागितला पण माझ्याजवळ फोटो नव्हता आणि मला माहित होते कि फोटो पाहून ते माझी कास्टिंग करणार नाहीत. नंतर श्याम बेनेगल यांना कौशिक यांनी म्हंटले कि माझ्याजवळ फोटो नाही, पण एक्स-रे रिपोर्ट् आहे. मी आतमधून खूप चांगला व्यक्ती आहे. सतीश यांच्या या गोष्टीमुळे त्यांचे मन जिंकले. ते हसले आणि सतीश कौशिक यांना मंडी चित्रपटामध्ये काम मिळाले.
सतीशने पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही आणि आपल्या ४० वर्षाच्या करियरमध्ये त्यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपटामध्ये काम केले. अनिल कपूर आणि श्रीदेवीच्या मिस्टर इंडिया चित्रपटामधून त्यांना चांगली ओळख मिळाली. १९८७ मध्ये आलेल्या या चित्रपटामध्ये त्यांनी कॅलेंडरची भूमिका केली होती. त्यांची हि भूमिका खूपच पसंद केली गेली होती.
सतीशच्या निधनावर दिग्गज अभिनेता आणि त्यांचा खास मित्र अनुपम खेरने शोक व्यक्त केला आहे. अनुपम यांनी ट्वीट करत लिहिले आहे कि, मला माहित आहे कि मृत्यू हे शेवटचे सत्य आहे पण माझ्या जिवलग मित्रासाठी हि गोष्ट लिहीन असे मला स्वप्नात देखील वाटले नव्हते. ४५ वर्षाच्या मैत्रीला अचानक पूर्णविराम. Life will NEVER be the same without you SATISH ! ओम् शांति”।

Leave a Comment