अभिनेता रणवीर शौरीचे वडील आणि चित्रपट निर्माते कृष्ण देव शौरी यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले आहे. अभिनेताने शनिवारी सकाळी सोशल मिडियावर याची माहिती दिली. रणवीर शौरीने शनिवारी ट्विटरवर दिवंगत वडिलांचा एक फोटो शेयर केला आणि आपल्या वडिलांच्या मृत्यूबद्दल सांगितले. रणवीरने त्यांना आपली प्रेरणा आणि सुरक्षेचे सर्वात मोठा स्त्रोत म्हणून देखील वर्णन केले.

अभिनेत्याने आपल्या वडिलांचा एक हसतमुख फोटो शेअर करत लिहिले आहे कि, त्यांच्या मुलांनी आणि नातवांनी वेढलेले माझे प्रिय वडील कृष्ण देव शौरी यांचे ९२ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी आपल्या मागे विस्मयकारक आठवणी आणि अनेक चाहते सोडले आहेत.

मी माझा सर्वात मोठा प्रेरणास्त्रोत गमावला आहे रणवीरचे मित्र आणि इंडस्ट्रीतील सहकारी तसेच चाहत्यांनी या पोस्टवर शोक व्यक्त केला. टीव्ही निर्माते राज नायक यांनी लिहिले आहे कि तुझ्या नुकसानीबद्दल क्षमस्व त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. लेखक-निर्देशक मिहिर फडणवीसने लिहिले आहे कि तुझ्या नुकसानीबद्दल खेद आहे.

कृष्ण देव शौरी एक चित्रपट निर्माते होते, ज्यांनी १९७० आणि ८० च्या दशकामध्ये जिंदा दिल, बे-रेहम और खराब आणि बदनाम सारख्या चित्रपटांची निर्मिती केली होती. याशिवाय त्यांनी १९८८ मधील महायुद्ध चित्रपटाची देखील निर्मिती केली होती. ज्यामध्ये गुलशन ग्रोवर, मुकेश खन्ना, कादर खान आणि परेश रावल सारखे कलाकार होते. त्यांनी आपल्या दोन चित्रपटांमध्ये जज म्हणून कोणतेही श्रेय न घेता कॅमिओ देखील केला होता.