सिनेसृष्टीला मोठा ध’क्का ! ३०० पेक्षा जास्त म्यूझिक व्हिडीओमध्ये काम केलेल्या ‘या’ दिग्गज अभिनेत्याचे नि’धन…

By Viraltm Team

Published on:

आसाम फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेता किशोर दासचे निधन झाले आहे. वयाच्या ३० व्या वर्षी किशोर दासने अखेरचा श्वास घेतला. किशोर हा कॅन्सरग्रस्त होता. चेन्नईमधील एका हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीच किशोरने हॉस्पिटलमधील एक फोटो शेयर केला होता.

फोटो शेयर करत किशोरने आपल्या समस्यांबद्दल सांगितले होते. पोस्टमध्ये किशोरने सांगितले होते कि त्याच्या उपचाराचा चौथा टप्पा सुरु आहे. जे तुम्हाला मारू शकत नाहीत ते तुम्हाला आणखीनच मजबूत बनवते. सध्या माझा किमोथेरेपीचा चौथा टप्पा सुरु आहे.

हे दिसते तितके सोपे नाही. यादरम्यान मला खूप समस्या जाणवत आहेत. मला उलट्या, चक्कर, थकवा अश्या समस्या होता आहेत. त्याचबरोबर त्याचे साइड इफेक्ट्स देखील जाणवत आहेत. डॉक्टरांना विचारल्याशिवाय मला औषध घेता येत नाही.

मी लवकरच बरे व्हावे अशी अशा करतो, तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. ३०० पेक्षा जास्त म्यूझिक व्हिडीओमध्ये किशोरने काम केले आहे. turrut turut या गाण्यामुळे त्याला खूप लोकप्रियता मिळाली होती. त्याचबरोबर बंधुन आणि बिधाता या सिरीयलमध्ये देखील तो अभिनय करताना पाहायला मिळाला होता.

या सिरीयलमधील अभिनयाने त्याने दर्शकांच्या मनामध्ये घर निर्माण केले होते. इंडियाज गॉट टॅलेंच आणि डान्स इंडिया डान्स या रियालिटी शोमध्ये देखील भाग घेतला आहे. २०२०-२१ मध्ये किशोर दास ला सर्वात लोकप्रिय अभिनेत्याचा एशियानेट आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Leave a Comment