फिल्म इंडस्ट्री हादरली ! ३ इडियट्स, केदारनाथ, लगे रहो मुन्नाभाई सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्याचे दुखद निधन, ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

By Viraltm Team

Updated on:

मनोरंजन क्षेत्रामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेते अरुण बाली या जगामधून निघून गेले आहेत. ७९ व्या वर्षी अर्जुन बाली यांनी मुंबईतर अखेरचा श्वास घेतला. असे म्हंटले जात आहे कि ते अनेक दिवसांपासून आजारी होते. अरुण बाली यांनी त्यांच्या प्रकृतीमुळे काही महिन्यांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अरुण बाली हे मायस्थेनिया ग्रॅव्हिस या दुर्मिळ आजाराशी झुंज देत होते. मायस्थेनिया ग्रॅव्हिस हा स्वयंप्रतिकार रोग आहे. हा रोग नसा आणि स्नायू यांच्यातील संवादाच्या बिघाडामुळे होतो. अरुण बाली इंडस्ट्रीमधील अनुभवी कलाकार होते. ज्यांचे जाण्याने प्रत्येकजण भावूक झाला आहे. अरुण बाली यांच्या जाण्याने सिनेइंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.

वर्षाच्या सुरुवातीला टीव्ही अभिनेत्री नुपूर अलंकारच्या एका मुलाखतीमध्ये अरुण बालीच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली होती. त्यावेळी नुपूर CINTAAची मेंबर देखील होती. नुपूरने अभिनेत्याविषयी बोलताना म्हंटले होते कि त्यांना व्यवस्थित बोलता येत नाही. आपल्या सहकलाकाराची बिघडती प्रकृती पाहून नुपूरने त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता. यानंतर अरुण बाली यांच्या मुलीने त्यांच्या आजाराविषयी बोलताना सांगितले होते कि त्यांना ऑटोइम्यून डिजीज झाला आहे.

अरुण बालीने ९० च्या दशकामध्ये अभिनय करियरची सुरुवात केली होती. त्यांनी राजू बन गया जेंटलमन, खलनायक, फ्लॉवर्स एंड एम्बर्स, आ गले लग जा, सत्या, हे राम, ओम जय जगदीश, केदारनाथ, लगे रहो मुन्नाभाई अशा चित्रपटांमध्ये काम केले. भाई ३ इडियट्स, बर्फी, एअरलिफ्ट, बागी, पानिपत, केदारनाथ आणि लाल सिंग चड्ढा यांसारख्या अनेक चित्रपटांचा ते भाग राहिले आहेत. याशिवाय त्यांनी टीव्ही सिरियल्समध्ये देखील काम केले.

अरुण बाली यांनी फिर वही तलाश, दिल दरिया, देख भाई देख, महाभारत कथा, शक्तिमान, कुमकुम, देवों के देव महादेव आणि स्वाभिमान सारख्या शोमध्येही काम केले आहे. पण त्यांना खरी लोकप्रियता कुमकुम सिरीयलमधून मिळाली. शोमध्ये त्यांनी कुमकुम म्हणजेच जुही परमारच्या आजोबांची भूमिका साकारली होती.

Leave a Comment