बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर आज आपला ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. २६ जून १९८५ रोजी त्याचा जन्म झाला होता. अर्जुन कपूर असा अभिनेता आहे जो चित्रपटांपेक्षा त्याच्या खासगी आयुष्यामुळेच जास्त चर्चेमध्ये राहतो.
अभिनेता अर्जुन सध्या अभिनेत्री मलायका अरोराला डेट करत आहे. अर्जुन कपूरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मलायका आणि अर्जुन दोघे पॅरिसला गेले आहेत. अर्जुन कपूरने आर्य विद्या मंदिर शाळेमधून आपले ११ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
११ वीमध्ये नापास झाल्यानंतर त्याने शिक्षण सोडले. वयाच्या २० व्या वर्षी अर्जुनचे वजन तब्बल १४० किलो होते. पण सलमान खानच्या एका सल्ल्यामुळे त्याने आपले वजन कमी केले आणि त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले.
एका मुलाखती दरम्यान अर्जुन म्हणाल होता कि त्याची आई आणि बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना सौरी कपूरने कधीच त्याच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नाविषयी द्वेष केला नाही. बिनी कपूर आणि श्रीदेवी यांनी १९९६ मध्ये लग्न केले होते. तर बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना हि टीव्ही मालिका निर्माती होती.
अर्जुन कपूरची ई मोना कपूरचे २०१२ मुळे कर्करोगामुळे निधन झाले. त्याने आपल्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल म्हंटले होते कि मला आधी राग आला होता पण नंतर मला सर्वकाही समजले. हा त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. माझ्या आईने मला जीवनातील निर्णय घेण्याइतके तरी चांगले वाढवले.
अर्जुनने अभिनय क्षेत्रामध्ये उतरण्यापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. कल हो ना हो, सलाम नमस्ते या चित्रपटात त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. यानंतर त्याने नो एंट्री आणि वॉन्टेड सारख्या चित्रपटांमध्ये सहयोगी दिग्दर्शक म्हणून काम केले.
अर्जुन कपूरची सलमान खानशी खूप जवळीक होती. विशेष म्हणजे सलमान खानची बहिण अर्पिताला देखील त्याने डेट केले आहे. अर्जुन सध्या आपल्यापेक्षा १२ वर्षाने मोठ्या असणाऱ्या मलायका अरोराला डेट करत आहे. २०१६ मध्ये दोघा एकमेकांच्या रिलेशनमध्ये आहेत.