लेकीला जन्म दिल्यानंतर आलिया भट्ट म्हणते, माझ्या शरीरामद्ये अनेक बदल झाले…

By Viraltm Team

Published on:

आलिया भट्टसाठी गेले वर्ष खूपच चांगले गेले आहे. आलिया आता आई झाल्यानंतर फिटनेसवर लक्ष देत आहे. पोस्ट प्रेग्नंसी वर्कआउटमध्ये व्यस्त असलेली आलिया भट्टने आपल्या चाहत्यांसोबत या जर्नीची झलक शेयर केली आहे. त्याचबरोबर आलिया भट्टने प्रेग्नंसीनंतर शरीरामध्ये आलेल्या बदलांबद्दलही सांगितले आहे.

आलिया भट्टने सांगितले कि प्रेग्नंसीमध्ये माझ्या शरीरामध्ये खूप बदल झाले पण आता सर्व काही रुळावर येत आहे. यासाठी आलिया भट्टने आता कंबर कसली आहे. आलियाने आपल्या बॉडीला फिट करण्यासाठी वर्कआउट सुरु केले आहे. आलियाने याचा एक फोटो इंस्टाग्राम वर शेयर केला आहे.

मुलगी राहाच्या जन्मानंतर जवळ जवळ दीड महिन्यानंतर आलिया पुन्हा फिटनेस ट्रॅकवर परतली आहे. आलिया भट्टने एक्सरसाइज सुरु केली आहे. त्याचबरोबर आलियाने इतर महिलांना देखील फिटनेस टिप्स दिल्या आहेत. आलिया बाहत्तने सांगितले कि तिने जवळ जवळ २ आठवडे कोणतीही एक्सरसाइज केली नाही. यादरम्यान ती फक्त वॉक करत होती.

आता आलियाने पुन्हा योगा करण्यास सुरुवात केली आहे. याचा फोटो शेयर करत आलियाने सांगितले कि ती लवकरच प्रेग्नंसी वेट कमी करेल. यासाठी तिने योगा ट्रेनरचे द्केहील आभार मानले आहे. आलिया बाहत्त लवकरच कामावर परतणार आहे.

आलिया भट्टसाठी २०२२ खूपच आनंदाचे गेले. गेल्या वर्षी आलियाने रणबीर कपूरसोबत लग्न केले. यासोबत ती आई देखील झाली. आलियाने याच वर्षी आपल्या करियरमधी सर्वात हिट चित्रपट दिला. आता आलियाने २०२३ साठी कंबर कसली आहे. लवकरच आलिया सेटवर परतणार आहे.

Leave a Comment