कपूर कुटुंबामध्ये लवकरच येणार एक छोटा पाहुणा, आलिया भट्ट प्रसूतीसाठी रिलायन्स हॉस्पीटलमध्ये दाखल, लवकरच मिळणार गुड न्यूज…

By Viraltm Team

Published on:

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या घरी लवकरच एक लहान पाहुणा येणार आहे. कपूर कुटुंबि आणि भट्ट कुटुंब येणाऱ्या लहान बाळाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतेच आलिया भट्टच्या बेबी शॉवरच्या फोटोंमध्ये दोन्ही कुटुंबाचा आनंद पाहायला मिळाला होते. आलियाच्या बेबी शॉवरनंतर आता तिच्या प्रसूतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. माहितीनुसार आलिया भट्टला रविवारी सकाळी रिलायन्स हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने बेबीच्या स्वागतासाठी सर्व तयारी केली आहे. माहितीनुसार बेबीच्या आगमनाची तारीख नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये होती. पण रविवारी आलिया भट्टला हॉस्पीटलमध्ये दाखल केल्याने छोटासा पाहुणाही या जगात येण्यासाठी अधीर होत असल्याचे दिसून येत आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने आपल्या बाळाच्या जन्मासाठी रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलची निवड केली आहे. आलिया भट्टचे नाव हॉस्पीटलमध्ये आधीच रजिस्टर केले गेले होते. आलिया भट्टच्या डिलिव्हरीसाठी हॉस्पीटलमध्ये दाखल होण्याच्या बातमीनंतर तिच्या चाहत्यांमध्ये आता उत्साह वाढला आहे.

आलिया भट्ट और रणबीर कपूरचे एप्रिल २०२२ मध्ये लग्न झाले होते. लग्नाच्या दोन महिन्यानंतर आलियाने आपल्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती. आलिया भट्टने प्रेग्नंसीदरम्यानदेखील ब्रह्मास्त्र चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले होते. चित्रपट रिलीज झाल्यानंतर आलिया भट्टने काम करणे बंद केले, प्रेग्नंसीदरम्यान तिने एडामामा हा मॅटर्निटी कपड्यांचा ब्रँड लॉन्च केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

Leave a Comment