संगीतसृष्टी हा’दर’ली ! बॉलीवूडमधील ‘या’ दिग्गज गा’यका’चे नि’धन, वयाच्या ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वा’स…

By Viraltm Team

Published on:

ज्येष्ठ पार्श्वगायक भूपिंदर सिंग यांचे सोमवारी संध्याकाळी मुंबई येथे नि’ध’न झाले आहे. ते ८२ वर्षांचे होते. त्यांची पत्नी आणि गायिका मिताली सिंहने याची पुष्टी केली आहे. त्यांची पत्नी मितालीने सांगितले कि ते काही दिवसांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. त्याचबरोबर त्यांना इतर आरोग्याच्या समस्या देखील होत्या.

भूपिंदर सिंग यांनी मौसम, सत्ते पे सत्ता, आहिस्ता आहिस्ता, दूरियां, हकीकत आणि इतर अनेक सुपरहिट चित्रपटांमधील संस्मरणीय गाण्यांना आपला आवाज दिला आहे. होके मजबूर मुझे, उसने बुलाया होगा, (मोहम्मद रफी, तलत महमूद आणि मन्ना डे सोबत), दिल ढूंढता है, दुक्की पे दुक्की हो या सत्ते पे सत्ता हि त्यांची काही प्रसिद्ध गाणी आहेत.

भूपिंदर सिंह हे भारतीय संगीतकार आणि गझल गायक होते त्यांनी लहानपणी आपल्या वडिलांकडून गिटार वाजवायला शिकले होते. त्यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९४० रोजी पंजाबच्या अमृतसरमध्ये झाला होता. त्यांचे वडील नत्था सिंह देखील एक उत्कृष्ठ गायक होते.

भूपिंदर सिंह यांनी दिल्लीला आल्यानंतर ऑल इंडिया रेडियोसाठी गायक आणि गिटारवादक म्हणून काम केले होते. त्यांना १९६४ मध्ये संगीतकार मदन मोहन यांनी पहिला मोठा ब्रेक दिला होता. १९७८ मध्ये रिलीज झालेल्या गुलजार चित्रपटामधील जो शहर था गाण्यासाठी त्यांना खूपच लोकप्रियता मिळाली होती. १९८० मध्ये त्यांनी बांग्ला गायिका मिताली मुखर्जीसोबत लग्न केले होते. त्यांना मूलबाळ नव्हते.

१९६२ मध्ये संगीत दिग्दर्शक मदन मोहन यांनी भूपिंदर यांना आकाशवाणीचे निर्माते सतीश भाटिया यांच्या डिनर पार्टीमध्ये भूपिंदर यांना गाताना पाहिले होते. यानंतर त्यांनी भूपिंदर यांना मुंबईला बोलावून घेतले आणि मोहम्मद रफी, तलत महमूद आणि मन्ना डे यांच्यासोबत होके मजबूर उसने मुझे बुलाया होगा गाण्यासाठी त्यांना संधी दिली. हकीकत चित्रपटाचे हे गाणे खूपच हिट झाले होते.

Leave a Comment