२०२० हे वर्ष बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीसाठी सर्वात वाईट वर्ष ठरले आहे. या वर्षामध्ये अशा अनेक दिग्गज कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला. यांच्या मृत्युची बातमी ऐकून त्यांच्या कुटुंबियांसोबत चाहते देखील निराश झाले. तर बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूरच्या मृत्यू गूढ अजून देखील उलघडलेले नाही. यांमधील काही अभिनेते असे देखील होते ज्यांनी खूपच कमी वयामध्ये जगाचा निरोप घेतला. अशामध्ये सर्वजण हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत कि शेवटच्या दिवसांमध्ये या अभिनेत्यांचे शेवटचे शब्द काय होते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि या अभिनेत्यांनी निधनाच्या अगोदर सोशल मिडियावर कोणते शेवटचे शब्द सांगितले होते. जे जाणून घेतल्यानंतर तुमचे देखील डोळे पाणावतील.
ऋषि कपूर: बॉलीवूडचे अभिनेते ऋषि कपूरने २०२० मध्ये ३० एप्रिल रोजी या जागाचा निरोप घेतला. ऋषि कपूरला कॅन्सर होता आणि त्यांचा इलाज दोन वर्षांपासून सुरु होता. ऋषि कपूरने शेवटचे ट्वीट केले होते ज्यामध्ये लिहिले होते कि, माझ्या सर्व बांधवांनो माझे तुम्हाला आवाहन आहे कि कृपया हिंसा, दगडफेक किंवा हत्या करण्यासारखे काम करू नका. डॉक्टर, नर्स, मीडियाकर्मी आणि पोलीसकर्मी हे सर्व तुम्हा लोकांचा जीव वाचवण्यासाठी आपले आयुष्य धोक्यामध्ये घालत आहेत. आपण सर्व कोरोना व्हायरसचे युद्ध जिंकू शकतो, जय हिंद.
इरफान खान: बॉलीवूड अभिनेता इरफान खान २९ एप्रिल रोजी हे जग सोडून निघून गेला. इरफान खान देखील कॅन्सरग्रस्त होता आणि त्याच्यावर मात करून तो स्वस्थ देखील झाला होता. पण अचानकच त्याने या जगामधून एक्झिट घेतली. त्याने आपले शेवटचे शब्द आपल्या आईसाठी लिहिले होते. कारण काही दिवसांपूर्वी त्याच्या आईचे निधन झाले होते. त्याने लिहिले होते कि आई इथेच आहे, मला घेऊन जाण्यास आली आहे. ती इथेच आहे माझ्या रूममध्ये, मला घेण्यास आली आहे, पहा माझ्याजवळ बसली आहे.
सुशांत सिंह राजपूत: बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वयाच्या ३४ व्या वर्षी या जगामधून एक्झिट घेतली. सुशांत आपल्या दिवंगत आईवर खूप प्रेम करत होता. त्याने आपल्या मृत्यूपूर्वी आपल्या आईसोबत एक फोटो शेयर करून लिहिले होते कि, अंधुक भूतकाळ, अश्रूंच्या थेंबानी वाष्पित होत आहे, कधीही न संपणारे हे स्वप्न हास्याला बाहेर काढत आहे आणि लवकरच संपुष्टात येणारे हे आयुष्य, दोघांमधील बातचीत.
राजेश खन्ना: बॉलीवूड अभिनेता राजेश खन्नाने १८ जुलाई २०१२ रोजी या जगाचा निरोप घेतला. राजेश खन्नाने आपल्या अंतिम शब्दांमध्ये म्हंटले होते कि वेळ संपली आहे, पॅकअप!
किशोर कुमार: हिंदी चित्रपटांमधील आॅल रॉउंडर अभिनेता म्यूजिक डायरेक्टर, सिंगर, लिरिसिस्ट, निर्देशक किशोर कुमारचा मृत्यू १३ ऑक्टोबर १९८७ मध्ये झाला होता. किशोर कुमारचे अंतिम शब्द होते, मी ठीक आहे, पण जर तू डॉक्टरला फोन केला तर मला खरेच हृदयविकाराचा झटका येईल.
या ५ बॉलीवूड कलाकारांचे शेवटचे शब्द वाचून तुमचे देखील डोळे पाणावतील…!
By Viraltm Team
Updated on: