लग्न होताच कतरिनाकडून सलमानला आणखी एक धोका, ऐकून म्हणाला आता हे करायची काय गरज होती !

By Viraltm Team

Published on:

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा विवाह ९ डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये पार पडला. लग्नानंतर हे दोन्ही स्टार्स हनीमूनसाठी मालदीवला गेले होते. यानंतर दोघंही मुंबईत परतले.

यानंतर सातत्याने बातम्या समोर येत होत्या की, कतरिनाला लग्नानंतर लगेच सलमान खानच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘टायगर 3’ च्या शूटिंगला जाणार आहे. पण आता समोर आलेल्या बातमीनंतर तुम्हीही म्हणाल की, कतरिनाने लग्नाबरोबरच सलमान खानची फसवणूक केली आहे.

कतरिनाने दिला सलमान खानला धोका :- लग्नाच्या काही दिवसांनंतर नवी नवरी कतरिना पती विकीसोबत जास्त वेळ घालवू शकली नाही. याचं कारण सांगितलं जात आहे की, ती ‘टायगर 3’चं शूटिंग करत होती.

पण आता कतरिना ‘टायगर 3’साठी नव्हे तर इतर कोणत्यातरी चित्रपटासाठी शूट करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. म्हणजेच ‘टायगर 3’ चित्रपटाच्या शूटिंगची तारीख बदलण्यात आली आहे.

मेरी ख्रिसमसचं आधी करणार शूट :- बातमीनुसार, लग्नानंतर कतरिना ‘टायगर 3’ ऐवजी ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाचं शूटिंग सुरू करणार आहे. श्रीराम राघवन या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. वृत्तानुसार, कतरिना या आठवड्यात या चित्रपटाचं शूटिंग सुरू करू शकते. मुंबईतील एका स्टुडिओमध्ये हे शूटिंग होणार आहे.

Leave a Comment