KGF स्टार यशने शेयर केला मुलगी आयराचा क्युट व्हिडीओ, पहा बोबड्या बोलीत म्हणाली; यशचा डायलॉग…

By Viraltm Team

Published on:

साऊथ इंडस्ट्रीमधील सुपरस्टार यशच्या केजीएफ २ ने छप्परफाड कमाई केली. चित्रपटामधील यशची शानदार अॅक्टिंग लोकांना खूपच आवडली. चित्रपटाने जवळ १००० करोड पेक्षा देखील जास्त कमी केली आहे. सगळीकडे फक्त केजीएफ चित्रपटाचीच चर्चा होत आहे.

इतकेच नाही तर दर्शकांवर देखील चित्रपटामधील डायलॉगची जादू चढली आहे आणि प्रत्येकजण हा रॉकिंग स्टार यशचा फॅन झाला आहे. यादरम्यान यशची मुलगी आयराचा एक क्युट व्हिडीओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्याला चाहते देखील खूप पसंद करत आहेत.

हा व्हिडीओ स्वतः यशने सोशल मिडियावर शेयर केला आहे आणि चाहते सतत यावर कमेंट आणि लाईक करून कौतुक करत आहेत. इतकेच नाही तर स्वतः यश देखील या व्हिडीओमध्ये आपल्या मुलीचे कौतुक करताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही ऐकू शकता कि आयरा यशचा डायलॉग बोलताना दिसत आहे.

सलाम रॉकी भाई गाण्याला आयराने क्युट अंदाजामध्ये गायले आहे. आयरा म्हणत आहे कि ‘सलाम रॉकी बॉय, रॉ…रॉ…रॉ..रॉकी’! हा व्हिडीओ शेयर करताना यशने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि सकाळची सुरुवात रॉकी ‘बॉय’ची चेष्टा करण्यापासून सुरु होतो. या व्हिडीओमध्ये आयरा खूपच क्युट दिसत आहे.

जिथे सुपरस्टार यश मोठ्या पडद्यावर विलेनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला तिथे खऱ्या आयुष्यामध्ये तो खूपच हळव्या स्वभावाचा आहे. यश नेहमी आपल्या मुलांसोबत मस्ती करतानाचे व्हिडीओ शेयर करत असतो. जिथे चित्रपटामधील सफलतेनंतर अभिनेते मोठमोठ्या पार्ट्या देतात तिथे केजीएफ २ च्या सफलतेनंतर यश आपल्या कुटुंबासोबत व्हेकेशनला गेला होता जिथे तो आपल्या मुलांसोबत मस्तीच्या अंदाजामध्ये खेळताना दिसला.

यशने आपल्या करियरची सुरुवात नंदगोकुला टीव्ही सिरीयल मधून केली होती. यानंतर त्याला २००८ मध्ये मोग्गिनी मनसु चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री राधिका पंडित मुख्य भूमिकेमध्ये होती. राधिका सध्या यशची पत्नी आहे. यश आणि राधिकाने १२ ऑगस्ट २०१६ मध्ये गोव्यामध्ये लग्न केले होते.

याशिवाय या कपलने ९ डिसेंबर २०१६ मध्ये बेंगलोरमध्ये देखील लग्न केले होते. यानंतर त्यांनी ग्रँड रिसेप्शन दिले होते ज्यामध्ये अनेक पॉपुलर कलाकार सामील झाले होते. नंतर २०१८ मध्ये राधिकाने मुलगी आयराला जन्म दिला यानंतर २०१९ मध्ये त्यांच्या घरी मुलगा यथर्वचा जन्म झाला. राधिका आणि यश आपल्या वैवाहिक आयुष्यामध्ये खूपच खुश आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash (@thenameisyash)

Leave a Comment