प्रत्येक महिला आई बनण्याचे स्वप्न पाहते. जेव्हा ती गर्भवती होते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत होतो. ती आपल्या घरामध्ये येणाऱ्या लहान पाहुण्याच्या स्वागताच्या तयारीमध्ये लागते. पण जर येणारा पाहुणा एकापेक्षा अचानक जास्त आले तर? म्हणजे एकदम चार मुले झाली तर. नक्कीच हि गोष्ट ऐकायला चांगली वाटते पण प्रत्यक्षात चार लहान मुलांचे संगोपन करणे खूप कठीण असते.
ऑस्ट्रेलियाच्या रओएबौरने मध्ये राहणारी ३० वर्षीय नटली मारीसोबत असेच झाले. नताली आणि तिचा पती गेल्या अनेक वर्षांपासून मुलासाठी प्रयत्न करत होते पण कॉम्प्लिकेशनमुळे असे होऊ शकले नाही. नंतर खूप प्रयत्न करून एक ट्रीट्मेंट नंतर तिला एक मुलगी झाली. या मुलीच्या जन्मानंतर नताली पुन्हा प्रेग्नंट झाली. तथापि यावेळी तिचे पोट सामान्यपेक्षा खूपच मोठे होऊ लागले होते.
आपले मोठे पोट पाहून नतालीने जेव्हा ७ व्या आठवड्यामध्ये सोनोग्राफी केली तेव्हा तिला समजले कि गर्भामध्ये एक किंवा दोन नाही तर चार मुले वाढत आहेत. गर्भामध्ये चार मुले असल्याचे समजतातच नताली आणि तिचा पती हैराण झाले. तथापि त्यांनी या चार मुलांना आनंदाने स्वीकारले. यामध्ये रंजक बाब हि आहे कि नतालीने दुसऱ्यांदा प्रेग्नंट होताना कोणत्याहि ट्रीटमेंट शिवाय या चार मुलांना नैसर्गिकरित्या कंसीव केले होते.
गर्भामध्ये एकदम चार मुले वाढत असल्यामुळे नतालीच्या पोटाची साईज खूप मोठी झाली. समस्या अशी होती कि मॅटरनिटी कपडे खरेदी करण्यास देखील तिला अडचण येत होती. चांगली गोष्ट हि होती कि नतालीने चारी मुलांना सुखरूप जन्म दिला. आई आणि सर्व मुले निरोगी आहेत. हि डिलीवरी सिजेरियन झाली होती. तथापि आता घरामध्ये चार सदस्य अचानक वाढल्याने पेरेंट्सला थोड्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.चारी लहान मुलांना दुध पाजण्यास नतालीला दीड तास लागतो. कधी एक मुल झोपते तर कधी दुसरे रडू लागते. त्यांना सांभाळण्यास कपलला खूपच समस्या येत आहेत. तथापि देवाने दिलेल्या या भेटीने ते खुश आहेत.
चारी मुलांचा जन्मानंतर देखील नतालीचे पोट खूप मोठे झाले आहे. तिच्या पोटावर खूप स्ट्रेच मार्क्स देखील आले आहेत. नताली आपल्या आफ्टर प्रेग्नेंसीचे फोटो सोशल मिडियावर शेयर करते. तथापि तिला याबद्दल कोणतीही लाज वाटत नाही.
मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.