जेव्हा शाहरुखने ऐश्वर्या रायसोबत काम करण्यास दिला होता नकार, अनेक चित्रपटांमधून केले होते रिप्लेस !

By Viraltm Team

Updated on:

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आजही तिच्या सौदर्यांने अनेक जणांना घायाळ करते. ऐश्वर्याचे चाहते आजही तिच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहतात, पण आता ती पहिल्यासारखी चित्रपटांमध्ये फारशी दिसत नाही. पण एक काळ असा होता की कोणीही तिच्यासोबत काम करण्यास तयार होत नव्हते. त्यावेळी ऐश्वर्याचे लव्ह लाईफ खूपच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते, आपल्याला ऐश्वर्या आणि सलमानच्या लव्ह लाईफबद्दल माहीतच आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यात एक क्षण असा येतो की आपल्या जवळचा व्यक्ती देखील आपल्याला सोडून दूर जातो. सलमान खानच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्यासोबतही असेच काहीसे घडले. जेव्हा बॉलीवूडच्या अनेक अभिनेते, दिग्दर्शक आणि तिचा फ्रेंड शाहरुखने देखील तिच्यासोबत चित्रपटामध्ये काम करण्यास नकार दिला होता. याचा खुलासा ऐश्वर्याने सिमी ग्रेवाल यांच्या शोमध्ये केला.

शाहरुखने पाच चित्रपटांमध्ये केले होते ऐश्वर्याला रिप्लेसवास्तविक, जेव्हा सलमान खान आणि ऐश्वर्या रायचा ब्रेकअप झाला तेव्हा शाहरुख खानला त्याचा एक खरा मित्र निवडायचा होता आणि त्यावेळी त्याने सलमान खानची निवड केली. यामुळे शाहरुख खानने सलग पाच चित्रपटांमध्ये ऐश्वर्याला रिप्लेस केले आणि ऐश्वर्याबरोबर काम करण्यास देखील नकार दिला.

याचा खुलासा ऐश्वर्याने सिमी ग्रेवालच्या मुलाखती दरम्यान केला. या मुलाखतीदरम्यान ऐश्वर्या आपल्या वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक आयुष्यापर्यंत अगदी मनमोकळेपणाने व्यक्त झाली होती. शो दरम्यान, जेव्हा सिमीने ऐश्वर्याला विचारले की शाहरुख खान तुझा एक चांगला मित्र होता, परंतु त्याने ‘वीर जारा’ यासह चार ते पाच चित्रपटांमध्ये तुमच्याबरोबर काम करण्यास नकार का दिला? ऐश्वर्याने त्यावेळी उत्तर देताना म्हंटले होते माझ्याकडे यावर उत्तर नाही.

ती म्हणाली की त्यावेळी शाहरुखसोबत एक ते दोन चित्रपटात एकत्र काम करण्याविषयी चर्चा झाली होती पण नंतर त्याने नकार दिला. सिमीने ऐश्वर्याला सांगितले की शाहरुखने त्याच्या एका मुलाखतीत या गोष्टीबद्दल खेद व्यक्त केला आहे आणि शाहरुख म्हणाला की ऐश्वर्या तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूपच व्यस्त झाली होती आणि ती त्यावेळी चित्रपटांवर जास्त लक्ष देत नव्हती. त्यामुळेच शाहरुखने ऐश्वर्यासोबत काम करण्यास नकार दिला होता, असे शाहरुखने त्या मुलाखतीत कबूल केले. पण त्यानंतर तब्बल १४ वर्षांनंतर हे दोघे “ऐ दिल है मुश्कील” या चित्रपटात एकत्र दिसले आहेत.

Leave a Comment