अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या घरी सोमवारी एका लहान परीचे आगमन झाले आहे. विराट आणि अनुष्का आई-पप्पा बनले आहेत. हि खुशखबरी विराटणे स्वतः चाहत्यांसोबत शेयर कली आहे. आता विरुष्काच्या लेकीचा पहिला फोटो समोर आला आहे. विराट कोहलीचा मोठा भाऊ विशाल कोहलीणे बेबी गर्लचा जीआईएफ व्हिडीओ शेयर केला आहे.
विराटच्या भावाणे शेयर केला जीआईएफ
हा फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे. विराटच्या भावाणे स्वतः याचा जीआईएफ व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेयर केला आहे. यामध्ये बेबी गर्लचे पाय पाहायला मिळत आहे. हि पोस्ट शेयर करताना त्याच्या भावाणे म्हंटले आहे, आनंदाला पारावर नाही, आमच्या घरी परी आली आहे. अनेक लोकांचे म्हणणे आहे कि हा फोटो मुलीचा नाही. तर अनेक चाहते याला मुलीचा फोटो मानत आहेत.
विराटने अशी दिली होती खुशखबरी
फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहते फोटोवर कमेंट करून विचारत आहेत कि हि विराट-अनुष्काची मुलगी आहे का? हा फोटो पाहिल्यानंतर लोकांमध्ये उत्सुकता आहे. विराटणे हि खुशखबरी शेयर करताना लिहिले होते कि आम्हा दोघांना हे सांगताना आनंद होत आहे कि आज आमच्या इथे मुलीचा जन्म झाला आहे. आम्ही तुमच्या प्रेम आणि शुभेच्यांचे आभारी आहे. अनुष्का आणि बाळ दोघे ठीक आहेत. हे आमचे सौभाग्य आहे कि आम्हाला या आयुष्यामध्ये या चॅप्टरचा अनुभव करण्याची संधी मिळाली. तुम्हाला माहिती आहे कि सध्या आम्हाला थोडी प्राइवेसी पाहिजे.लोक देत आहेत शुभेच्छा
हि बातमी समोर आल्यानंतर शुभेच्छाचा वर्षाव सतत सुरु आहे. चाहत्यांपासून ते क्रिकेट आणि बॉलीवूड सेलिब्रिटीज अनुष्का-विराटला भरभरून शुभेच्छा देत आहेत. सोशल मिडियावर आनंदाची लहर आहे. चाहते दोघांच्या येणाऱ्या बेबीच्या प्रतीक्षेत होते आणि आता ती वेळ आली आहे. दोघांचे जुने फोटो देखील चाहत्यांचा फॅनपेजेसवर शेयर केले जात आहेत.
बॉलीवूड सेलेब्स आणि क्रिकेट सेलेब्स देखील विरुष्काला शुभेच्छा देत आहेत. विराट-अनुष्काच्या कुटुंबासाठी हा आनंदाचा क्षण आहे. दोघांनी या दिवसाची उत्सुकतेने वात पाहिली होती आणि विराट सतत अनुष्काची काळजी घेत होता. इतकेच नाही तर तो पॅटर्निटी लीववर देखील होता.
मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.