कॅटरीना कैफच्या रिलेशनशिपबद्दल पहिल्यांदा बोलला विक्की कौशल, केले हे मोठे विधान !

By Viraltm Team

Published on:

विक्की कौशल बॉलीवूडमधील नवोदित कलाकारांपैकी एक आहे जो वेगाने लोकप्रियता मिळवत आहे. विक्की कौशल सध्या आपल्या आगामी चित्रपट भूत पार्ट वनः द हॉन्टेड शिप मुळे खूपच चर्चेमध्ये आहे. याशिवाय विक्की कौशल बॉलीवूड अभिनेत्री कॅटरीना कैफसोबतच्या अफेयर मुळे देखील खूप चर्चेमध्ये आला आहे.

या दोघांना अनेक वेळा एकत्र पाहिले गेले आहे. तथापि आतापर्यंत दोघांनीही आपल्या रिलेशन बद्दल अधिकृत वक्तव्य केलेले नाही. परंतु दोघांच्या मधील जवळीक पाहून असा अंदाज लावला जात आहे कि या दोघांमध्ये काहीना काही सुरु आहे. विक्की कौशलने पहिल्यांदाच कॅटरीना कैफसोबतच्या रिलेशनशिप बद्दल खुलासा केला आहे.विक्की कौशल म्हणाला आहे कि-मला माझ्या वैयक्तिक आयुष्याचे नेहमीच रक्षण करायचे आहे कारण तुम्ही याबद्दल बोलत असाल तर यामुळे ती आणखीनच पसरत जाते. यानंतर गैरसमज पसरले जातात आणि मला माझ्या आयुष्यामध्ये असे मुळीच नको आहे. विक्की कौशल पुढे म्हणाला – मला वाटते कि हेच चांगले राहील कि मी माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयी सतर्क राहावे आणि मला कोणत्याही गोष्टीवर उघडपणे बोलायची इच्छा नाही.विक्की कौशल आणि कॅटरीना कैफच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून समोर येत आहेत. अशा सुद्धा बातम्या समोर आल्या होत्या कि दोघांनी एकत्र नवीन वर्ष साजरे केले होते. विक्की कौशल चा चित्रपट २१ फेब्रुवारीला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन भानु प्रताप सिंह यांनी केले आहे.

Leave a Comment