फिल्मी जगतामध्ये जितके महत्व हिरोला असते तितकेच महत्व विलेनला देखील असते. खासकरून बॉलीवूड चित्रपटांमध्ये आपण पाहिलेच असेल कि हिरो आणि हिरोईनच्या मध्ये जर विलेन आला नाही तर चित्रपटाची कथा बोर वाटते. कित्येक वेळा तर आपण पाहिले असेल कि, एखाद्याचे प्रेम लवकर सफल होते तर एखाद्याचे प्रेम सफल होऊ शकत नाही. तसे तर हे आजचेच नाही तर शतकानुशतके चालू आहे जिथे स्टार्सच्या प्रेमाबद्दलच्या किस्स्यांची चर्चा होत आली आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका विलेनबद्दल सांगणार आहोत जो त्याच्या काळामध्ये खूप प्रसिद्ध होता.
आम्ही बोलत आहोत अमजद खानबद्दल. ७० आणि ८० च्या दशकामध्ये एक विलेन बनून प्रसिद्ध झालेला दिग्गज अभिनेता अमजद खानने आपल्या करियरमध्ये अनेक उत्कृष्ठ परफोर्मंस दिले आहेत. त्यांनी काही अशा भूमिका साकारल्या ज्या अजरामर बनून राहिल्या. लोक आजही त्यांच्या अभिनयाचे चाहते आहेत. शोलेमधील गब्बरची भूमिका साकारून अमजद खान खऱ्या आयुष्यामध्ये देखील गब्बर नावाने प्रसिद्ध झाले होते.अमजद खानची लोकप्रियता इतकी वाढली होती कि प्रेक्षक त्यांना खूप पसंत करत होते. परंतु तुम्हाला माहिती आहे का कि, अमजद खानवर एक अभिनेत्री अतोनात प्रेम करत होती आणि त्यांच्यासोबत लग्न करू इच्छित होती. इतकेच नव्हे तर अमजद खानसोबत लग्न न झाल्यामुळे हि अभिनेत्री आजदेखील अविवाहित आहे.
ज्या अभिनेत्रीबद्दल आम्ही सांगत आहोत तिचे नाव कल्पना अय्यर असे आहे. ८० च्या दशकामध्ये या अभिनेत्रीने आयटम साँग करून फिल्मी जगतामध्ये एकच खळबळ उडवून दिली होती. आयटम साँगमुळेच कल्पनाला एक वेगळी ओळख मिळाली आणि बघता बघता ती ८० च्या दशकातील प्रसिद्ध आयटम डान्सर बनली. त्याचबरोबर तिने अनेक चित्रपटांमध्ये व्हँपची भूमिका देखील साकारली.कल्पनाला आपण अमीर खानच्या राजा हिंदुस्तानी चित्रपटामध्ये परदेसी परदेसी या गाण्यामध्ये पाहिले असेल. तीच हि कल्पना अय्यर. कल्पना एक अशी अभिनेत्री म्हणून समोर आली जिने चित्रपटामध्ये आयटम नंबर्सला एक ओळख निर्माण करून दिली.
जेव्हा कधी कल्पना अय्यर बद्दल बोलले जाते त्यावेळी आपल्या समोर तिच्यावर चित्रित केलेली गाणी समोर येतात. कल्पनाला खूपच सेंसुअल आणि आकर्षक प्रतिमेची अभिनेत्री मानली जाते. ती एक उत्कृष्ठ अभिनेत्रीच नव्हती तर ती जबरदस्त पॉप सिंगर सुद्धा होती. जिने अनेक लाईव शोमध्ये परफॉर्म पण केले आहे.१९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या हम साथ-साथ हैं या चित्रपटामध्ये कल्पनाला शेवटचे पाहिले गेले होते. पण तुम्हाला हे माहिती नसेल कि अमजद खान आणि कल्पना अय्यर यांचे अफेयर खूप काळ चालले होते. त्यांचे हे संबंध अमजद खानच्या निधनापर्यंत सुरु होते.
अमजद खानचे निधन झाल्यानंतर कल्पनासुद्ध खूप खचली होती आणि तिने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. कल्पना आज ६३ वर्षांची असून अजूनही ती अविवाहित आहे. कल्पनाला जेव्हा कधी तिच्या लग्नाबद्दल विचारले जाते त्यावेळी ती म्हणते कि, मी लग्न का केले नाही याबद्दल अनेक प्रश्न आहेत, ज्यांची मी कधीच उत्तरे देऊ शकत नाही.