समाजातील जुन्या धारणा तोडून पुढे आल्या या अभिनेत्री, कोणी लग्नाशिवाय झाल्या प्रेग्नेंट तर कोण…!

By Viraltm Team

Updated on:

भारतीय समाज हा पुरुषप्रधान समाज आहे. परंतु आजच्या काळामध्ये परिस्थिती बदलत आहे, आणि स्त्रियासुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. बॉलिवूडमध्येही पुरुषांचे वर्चस्व अधिक आहे. बऱ्याचवेळा अशा बातम्या समोर येतात कि, अभिनेत्रींना अभिनेत्यांपेक्षा कमी मानधन मिळते.

याशिवाय अनेकदा स्त्रियांना चित्रपटांमध्ये एक आकर्षण आणि प्रेमाची वस्तू म्हणून दाखवले जाते. बॉलीवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी स्त्रियांबद्दलच्या चालत आलेल्या रूढी परंपरा नष्ट केल्या आहेत. आज आम्ही अशा महिलांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी स्त्रीची एक वेगळी परिभाषा स्थापन केली आहे.

लग्नानंतर आणि मुलांनंतर मिळत नाही काम :- बॉलीवूडमध्ये नेहमी पाहायला मिळते कि, जेव्हा कोणतीही अभिनेत्री लग्न करते किंवा प्रेग्नंट होते तेव्हा मिडीयाला टाळत असते आणि तिला कोणत्याही चित्रपटामध्ये काम मिळत नाही. पण करीनाने समाजातील या धारणेला मोडीत काढून एक नवीन परिभाषा स्थापित केली आहे.

जेव्हा करीना प्रेग्नंट होती त्यावेळी तिने कधीही आपला बेबी बंप लपवला नाही. याशिवाय तिने २०१६ मध्ये लैक्मे फॅशन वीकमध्ये आपल्या प्रेग्नंसीमध्ये रॅम्प वॉक देखील केला होता. ज्याची कोणी अपेक्षादेखील केली नव्हती. त्यावेळी करीना खूपच सुंदर दिसत होती.अडल्ट इंडस्ट्रीतून मेनस्ट्रीम चित्रपटांमध्ये :- अभिनेत्री सनी लिओनी पूर्वी अडल्ट इंडस्ट्रीमध्ये काम करत होती, परंतु नंतर तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आणि चित्रपटांमध्ये काम करू लागली. जेव्हा तिने बॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता त्यावेळी तिला खूप विरोध करण्यात आला होता, इतकेच नव्हे तर तिला जीवे मारण्याची धमकीही दिली गेली होती. पण सनी लिओनीने खंबीरपणे याचा सामना केला आणि आज तीचे बॉलिवूडमध्ये मोठे नाव आहे.स्त्रीने लग्न केले पाहिजे :- भारतीय समाजामध्ये मुलगी आणि स्त्रीचा सर्वात मोठा मुद्दा तिच्या लग्नाचा असतो आणि असे म्हंटले जाते कि एक सुखी जीवन जगण्यासाठी स्त्रीने लग्न केलेच पाहिजे. पण बॉलीवूड अभिनेत्री तब्बू, रेखा आणि सुष्मिता सेन अशा स्त्रिया आहेत ज्या अविवाहित असून कोणाच्याही आधाराशिवाय आयुष्य जगत आहेत. याशिवाय लग्नानंतरच मुले असावीत, सुष्मिताने हा स्टीरियोटाइप सुद्धा दोन मुलींना दत्तक घेऊन मोडीत काढला. मध्यंतरी कल्की कोचलीनसुद्धा लग्नाशिवाय प्रेग्नंट होती.फक्त स्लिम बॉडी असणाऱ्या अभिनेत्रींनाच मिळते काम :- असे अनेकदा ऐकायला मिळते कि फक्त स्लिम बॉडी असणाऱ्या अभिनेत्रींनाच बॉलीवूडमध्ये काम मिळते. विद्या बालनने हा रूढीवाद मोडून काढला. विद्या बालनला तिच्या फिगरबद्दल कधीही निराशा वाटली नाही. त्याऐवजी आज ती तिच्या फिगरमुळेच एक टॉपची अभिनेत्री आहे. तिने डर्टी पिक्चर या चित्रपटामध्ये अनेक बोल्ड सीन दिले होते, ज्यासाठी तिच्या धाडसाचे कौतुक केले गेले होते.प्रेमामध्ये वय :- बरेचदा असे पाहिले जाते कि, लग्नाच्या वेळी मुलाचे वय हे मुलीच्या वयापेक्षा जास्त असते. आपल्या समाजामध्ये वर्षानुवर्षे हेच चालत आले आहे. पण प्रियांका चोप्राने याला छेद देत आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या निक जोनाससोबत लग्न केले. त्यांनी समाजाच्या या धारणेला मोडीत काढले.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment