या ४ अभिनेत्रींना नाही कोणतीही संतान, नंबर ४ थी होती सलमान खानची गर्लफ्रेंड !

By Viraltm Team

Published on:

हिंदी सिनेमा जगतामध्ये असे अनेक प्रसिद्ध कलाकार आहेत ज्यांनी इंडस्ट्रीमधील आपला जोडीदार निवडला आणि सात जन्म एकमेकांसोबत राहण्याची शपथ घेतली. तथापि या कलाकारांपैकी काही कलाकार असे देखील आहेत ज्यांनी पहिले लग्न मोडून दुसरे लग्न केले आणि विवाहित असून देखील दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडले आणि मुले असून देखील पहिल्या पत्नीला सोडून दिले. यामुळे त्यांची दुसरी पत्नी निपुत्रिक राहिली. तथापि काही अभिनेत्री यामुळे देखील आई बनल्या नाहीत कारण मेडिकल कंडीशन चांगली राहिली नाही किंवा कपलने परस्पर संमतीने मुल होऊ दिले नाही. अशाच ४ बॉलीवूड सेलिब्रिटी कपल्सबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. ज्यांची कोणतीही संतान नाही.

दिलीप कुमार आणि सायरा बानो५० आणि ६० च्या दशकामध्ये दिलीप कुमार बॉलीवूडमधील मोस्ट एलिजिबल बॅचलर्सपैकी एक होते. पण मधुबालाशी ब्रेकअप झाल्यानंतर त्यांची भेट सायरा बानोशी झाली. त्यावेळी सायरा बानो नवीन नवीन इंडस्ट्रीमध्ये आली होती आणि तिला वयाची परवा न करता २२ वर्षांनी मोठ्या दिलीप कुमारसोबत लग्न केले. लग्नाच्या नंतर जेव्हा सायराने मुल होऊ देण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिचा ग र्भ पा त झाला आणि ती आई बनू शकली नाही. यानंतर दोघांनी एकमेकांसोबत आनंदाचे राहण्याच्या निर्णय घेतला.

मीना कुमारी आणि कमाल अमरोही
आपल्या काळातील प्रसिद्ध डायरेक्टर कमाल अमरोही आणि सिल्वर स्क्रीनची ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारीच्या रिलेशनचे चर्चे बॉलीवूडमध्ये खूपच फेमस झाले होते. यांची भेट सेटवर झाली होती आणि इथेच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांच्या वयामध्ये १५ वर्षांचे अंतर होते कारण मीनापेक्षा कमाल १५ वर्षांनी मोठे होते आणि विवाहित होते. पहिल्या पत्नीपासून त्यांना मुले देखील होते. असे म्हंटले जाते कि मीना कुमारसोबत कमालने फक्त या अटीवर लग्न केले होते कि लग्नानंतर मुल होऊ देणार नाही. लग्नानंतर दोघांमध्ये मतभेद वाढू लागले आणि एक काळ असा आला जेव्हा ते एकटेपणाचे शिकार झाले. १९७२ मध्ये मीना कुमारीचे लिवर सोरायसिसमुळे निधन झाले.

साधना आणि आर के नय्यर
बॉलीवूडच्या फेमस जोडींच्या लिस्टमध्ये सामील असलेले साधना शिवदासानी आणि आरके नय्यर आपल्या काळामधील खूपच प्रसिद्ध आणि रोमँटिक कपल होते. दोघांनी १९६६ मध्ये लग्न केले होते आणि त्यावेळी साधना हिंदी चित्रपटामधील एक मोठे नाव होते आणि नय्यर साहेब इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध डायरेक्टर होते. दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत होते पण काही कारणांमुळे साधना आई बनू शकली नाही.

संगीता बिजलानी आणि मोहम्मद अज़हरुद्दीन
एके काळी सलमान खानसोबत अफेयरच्या चर्चेमध्ये राहणारी संगीता बिजलानीचे लग्न टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अज़हरुद्दीन सोबत झाले. संगीता एक मॉडल आणि अभिनेत्री होती. दोघांची भेट ९० च्या दशकामध्ये झाली होती. अज़हरुद्दीनने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन संगीतासोबत १९९६ मध्ये लग्न केले होते. अज़हरुद्दीनला पहिल्या पत्नीपासून मुले आहेत पण संगीतापासून त्याला कोणतीही संतान नाही.

Leave a Comment