बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर सोशल मिडियावर त्याच्या फोटो आणि व्हिडिओंद्वारे चाहते त्याची आठवण करत आहेत. सुशांतच्या मृत्युच्या पाच दिवस अगोदर त्याच्या अकाउंटला एक आठवण बनवले गेले आहे. इंस्टाग्रामने त्याच्या नावाच्यासमोर रिमेंबरिंग असेल लिहिले आहे. याबरोबर आता त्याचे अकाउंट एक आठवण म्हणून इंस्टाग्रामवर राहील.खरे तर इंस्टाग्रामच्या पॉलिसीनुसार कोणत्याही सेलिब्रिटीच्या मृत्युनंतर त्याचे अकाउंट मेमोरलाइज्ड केले जाते. त्याचबरोबर स्टारच्या नावाच्या समोर रिमेंबरिंग असे लिहिले जाते.काय असते मेमोरलाइज्ड अकाउंट :- मेमोरलाइज्ड अकाउंट्स झाल्यानतर एक प्रकारे अकाउंटचे सर्व राइट्स संपुष्टात आणले जातात. सुशांतच्या अकाउंटमध्ये आता कोणताही बदल केला जाऊ शकत नाही. आणि कोणताही फोटो किंवा व्हिडिओ अपलोड केला जाऊ शकत नाही किंवा काढला जाऊ शकत नाही. याचबरोबर त्याच्या प्रोफाइलमधील डिटेल्सदेखील बदलले जाऊ शकत नाहीत. त्याचे फॉलोअर्सदेखील आता वाढू किंवा कमी होऊ शकणार नाहीत.
सुशांत सिंहच्या इंस्टाग्राम अकाउंटवर १२.४ मिलियन म्हणजेच एक करोड २४ लाख फाॅलोअर्स आहेत. त्याने एकूण ८७ पोस्ट आपल्या चाहत्यांसोबत शेयर केल्या आहेत. सुशांत ६७३७ लोकांना फॉलो करत होता. सुशांत अशा अभिनेत्यांपैकी एक होता जो आपल्या चाहत्यांना देखील फॉलो करत होता.सुशांत सिंह राजपूतने गेल्या रविवारी १४ जूनला ग*ळ*फा*स घेऊन आ*त्म*ह*त्या केली होती. हि बातमी ऐकून त्याच्या वडिलांना मोठा धक्का बसला होता आणि ते बेशुद्ध झाले होते. सुशांतच्या कुटुंबाने गुरुवारी त्याच्या अस्थी विसर्जनासोबत त्याला शेवटचा निरोप दिला. यादरम्यान त्याचे वडील आणि तिघी बहिणी भावूक होऊन त्याची आठवण काढत होते.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.