बॉलीवूडमधील हे सुपरस्टार्स आहेत या प्रसिद्ध कंपन्यांचे मालक, नंबर १ आहे सर्वात लोकप्रिय !

By Viraltm Team

Published on:

हे तर सर्वांनाच माहिती आहे कि बॉलीवूड चित्रपटातील सुपरस्टार्स आपल्या अभिनयासाठी फक्त भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत परंतु आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडमधील अशा ७ प्रसिद्ध सुपरस्टार्स बद्दल सांगणार आहोत ज्यांची लोकप्रियता त्यांच्या कंपन्यांच्या सोबत देखील जोडली गेली आहे ज्यांचे ते मालक आहेत.

अजय देवगन :- बॉलीवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगनने अतिशय विचार करून आपली काही संपत्ती एका चांगल्या उपक्रमांमध्ये गुंतवली आहे. गुजरातमधील चरणक सौर परियोजना मध्ये तो एक भागीदार आहे. अजयने रोहा ग्रुपसोबत २५ करोडच्या एका प्लांटमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे. शिवाय अजय देवगनचे स्वतःचे प्रोडक्शन हाउस देखील आहे आणि एक वीएफएक्स स्टूडियोचा तो मालक देखील आहे.अक्षय कुमार :- बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीचा खिलाडी अक्षय कुमार पण कमाईच्या बाबतीमध्ये मागे नाही. अक्षय हरिओम एंटरटेनमेंट या कंपनीचा मालक आहे आणि याशिवाय तो अनेक ब्रँडसोबत देखील जोडला गेला आहे. ज्याची फीस करोडोमध्ये आहे. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करतात.

अमिर खान :- बॉलीवूडमधील सर्वात सफल आणि मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता अमीर खान वर्षातून फक्त एकच चित्रपट करतो आणि तो चित्रपट ब्लॉकबस्टर होतो. याशिवाय त्याचे अमीर खान फिल्म्स नावाचे प्रोडक्शन हाउस देखील आहे.

ऋतिक रोशन :- नुकतेच बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेला चित्रपट वॉर मध्ये पाहायला मिळालेला अभिनेता ऋतिक रोशनची कंपनी HRX गारमेंट्स आणि स्पोर्ट्स वेयर साठी प्रसिद्ध आहे. या कंपनीचे भारतामधील अनेक शहरांमध्ये स्टोर उपलब्ध आहेत.शाहरुख खान :- एसआर के मोशनल पिक्चर प्रोडक्शन कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटचा मालक आहे. त्याची प्रोडक्शन कंपनी चित्रपटांचे निर्माण करते आणि त्याचे सुद्धा एफ एक्स डिवीजन, अन्य प्रोडक्शन हाउस आणि चित्रपट निर्मात्यांचे बीएफएक्स आणि प्रीमियर लीग क्रिकेट टीम कोलकाता नाइट राइडर्सचा मालक देखील आहे. त्याचबरोबर तो अनेक ब्रँडसोबतहि जोडला आहे.

सलमान खान :- बीइंग ह्यूमन नावाने सलमान खानची हि कंपनी कपड्यांपासून ते जिम, सायकल अशा अनेक व्यवसायांशी संबंधित आहे. याची लोकप्रियता भारताच्या प्रत्येक घरामध्ये झाली आहे आणि सलमान खान गरजू लोकांना याच कंपनीच्या माध्यमातून मदत देखील करत असतो.

जॉन अब्राहम :- जॉन अब्राहम चित्रपटामध्ये अभिनय तर करतोच त्याशिवाय तो चित्रपट निर्मितीमध्ये देखील खूप सक्रिय आहे. त्याची फिल्म कंपनी JH प्रोडक्शन खूपच लोकप्रिय आहे. त्याचबरोबर जॉन अब्राहम एका जिमचा मालक देखील आहे.

Leave a Comment