२० वर्षांपूर्वी सनी देओलच्या चुकीच्या निर्णयामुळे वाचले होते अक्षय कुमारचे करियर !

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील कलाकारांच्या आयुष्यामध्ये अनेक वेळा अशी वेळ येते जेव्हा ते चांगल्या किंवा वाईट चित्रपटांची निवड योग्य प्रकारे करत नाहीत. बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील खिलाडी अक्षय कुमारसोबतहि अशीच घटना झाली होती. एकदाच नाही तर अक्षयसोबत अशा घटना अनेकवेळा घडल्या आहेत. जेव्हा त्याने चुकीच्या चित्रपटांची निवड केली तेव्हा त्या चित्रपटांचा निकाल असा लागला कि प्रत्येक वेळी ते चित्रपट फ्लॉप ठरले. १९९६ मध्ये प्रदर्शित झालेला खिलाड़ियों का खिलाड़ी या चित्रपटानंतर त्याचे तब्बल १४ चित्रपट फ्लॉप ठरले होते.

अक्षय कुमारने स्वतः एका मुलाखतीदरम्यान या गोष्टीचा खुलासा केला आहे कि, त्याला वाटले होते कि आता आपले करियर संपुष्टात आले आहे. परंतु त्याचवेळी सनी देओलच्या एका चुकीच्या निर्णयामुळे अक्षय कुमार चे करियर वाचले होते. होय हे खरे आहे, २० वर्षांपूर्वी डिसेंबर १९९९ मध्ये अक्षय कुमारचा चित्रपट जानवर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडला होता आणि बॉक्स ऑफिस हिट झाला होता.अक्षय कुमारचा जानवर हा चित्रपट ६.२५ करोड रुपये बजटमध्ये बनवण्यात आला होता आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०.६४ करोड रुपये इतकी कमाई केली होती. त्याचबरोबर या चित्रपटाने वर्ल्डवाइड १८.२९ करोड रुपये इतका गल्ला जमवला होता. खूपच कमी लोकांना माहिती आहे जानवर हा चित्रपट दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी सनी देओलसाठी लिहिला होता. परंतु जेव्हा सनी देओलला या चित्रपटाची फाईनल स्क्रिप्ट दाखवण्यात आली त्यावेळी त्याला ती आवडली नाही आणि त्याने या चित्रपटाला नकार दिला.

शेवटी या चित्रपटासाठी अक्षय कुमारला फाईनल करण्यात आले. याआधी अक्षयचे तब्बल १४ चित्रपट फ्लॉप झाले होते त्यामुळे अक्षयने या चित्रपटासाठी कठोर मेहनत घेतली हे त्यांच्या भूमिकेवरूनच आपल्याला पाहायला मिळते. या चित्रपटामध्ये अक्षय कुमारशिवाय शिल्पा शेट्टी, करिष्मा कपूर, मोहनीश बहल, आशितोष राणा आणि शक्ती कपूर या दिग्गज कलाकारांनी देखील काम केले आहे.असे म्हंटले जाते कि हा चित्रपट देशातील २५ शहरांमध्ये जवळजवळ १०० दिवसांपर्यंत चालला होता. अक्षय कुमारने आपल्या एका मुलाखतीमध्ये हे देखील मान्य केले आहे कि १९९९ मध्ये प्रदर्शित झालेला जानवर चित्रपट त्यांच्या फेवरेट चित्रपटांपैकी एक आहे.

Leave a Comment