नागिन बनण्यासाठी श्रीदेवीने आपल्या प्राणांची लावली होती बाजी, कायमची गेली असती डोळ्यांची दृष्टी !

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडमध्ये आतापर्यंत नाग, नागिनवर आधारित अनेक चित्रपट बनवण्यात आले आहेत. लोकांना असे चित्रपट खूप आवडले देखील होते. १९८६ मध्ये नगीना हा चित्रपट प्रदर्शित झाला होता जो लोकांना खूप आवडला देखील होता. या चित्रपटामध्ये श्रीदेवीने नागिनची भूमिका साकारली होती आणि तिची हि भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. तथापि हि भूमिका साकारण्यासाठी श्रीदेवीने जे केले होते त्यामुळे तिच्या डोळ्यांची दृष्टीदेखील कायमची गमावून बसली असती.

नगीना चित्रपटामध्ये श्रीदेवीचे नाव रजनी होते आणि ती एक नागिन होती. वेबसाईटच्या एका रिपोर्टनुसार श्रीदेवीने नागिन बनण्यासाठी वेगवेगळ्या रंगांच्या लेंस वापरल्या होत्या. अनेक वेळा लेंस बदलत असल्यामुळे तिच्या डोळ्यांवर वाईट परिणाम होऊ लागला होता. डॉक्टरांनी तिला सांगितले होते कि जर तुम्ही पुन्हा पुन्हा लेंस बदलल्या तर तुमच्या डोळ्यांची दृष्टी कायमची जाऊ शकते.असे सांगण्यात येते कि शुटींगच्या दरम्यान सेटवर श्रीदेवी डोळ्यांमध्ये औषध घालत होती. हे सुद्धा सांगितले जाते कि, या चित्रपटासाठी सर्वात प्रथम जयाप्रदाची निवड करण्यात आली होती. परंतु जयाप्रदाला जेव्हा समजले कि या चित्रपटामध्ये सापांच्या सोबत स्टंट करायचे आहेत त्यावेळी तिने हा चित्रपट करण्यास नकार दिला.त्यानंतर हा चित्रपट श्रीदेवीला ऑफर करण्यात आला. या चित्रपटासाठी श्रीदेवीला फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाला. ऋषि कपूरने या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली होती तर अमरीश पुरी सपेरा भैरवनाथच्या भूमिकेमध्ये दिसले होते. हा चित्रपट खूपच सुपरहिट झाला होता. या चित्रपटाचे गाणे मैं तेरी दुश्मन दुश्मन तू मेरा आजसुद्धा लोकांच्या ओठावर रेंगाळत असते. या गाण्यावर श्रीदेवीने धमाकेदार नृत्य सादर केले होते.

Leave a Comment