बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा नुकतेच मियामी बीच वर आई आणि पतीसोबत सिगरेट पिताना दिसली होती. प्रियांकाचा हा फोटो समोर आल्यानंतर चाहते हैराण झाले आणि त्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. खास बाब हि आहे कि प्रियांकाच्या त्या ट्वीटला घेऊन हि पोस्ट शेयर करत आहेत ज्यामध्ये प्रियांकाने धूम्र*पान आरोग्यास हानिकारक असल्याचे सांगितले आहे. सध्या प्रियांकाच्या या फोटोने सोशल मिडियावर चांगला धुमाकूळ घातला आहे.
अभिनेत्री प्रियांका चोप्रा यामुळे ट्रोल झाली कारण तिला अस्थमा आहे आणि ती अनेक वेळा सोशल मिडियावर धूम्र*पान विरोधात मोहीम करताना दिसली आहे पण जेव्हा स्वतः सिगरेट पिताना दिसली तेव्हा लोकांनी तिला चांगले ट्रोल केले. प्रियांकाच्या अगोदर देखील अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्या सिगरेट पिताना स्पॉट झाल्या आहेत. चला तर जाणून घेऊया त्या कोणत्या अभिनेत्री आहेत.
सारा खान
टीव्ही सिरीयल बिदाई मध्ये आपल्या भूमिकेनंतर सारा खूपच लोकप्रिय झाली. याशिवाय तिने अनेक रियालिटी शोमध्ये देखील भाग घेतला आणि काहीमध्ये विजेता देखील राहिली. अभिनेत्री सारा खानला देखील धूम्र*पान करण्याची सवय आहे. सारा अनेक वेळा पार्टीमध्ये धूम्र*पान करताना दिसली आहे.
रूपा गांगुली
रूपा गांगुली जिने महाभारतमध्ये द्रौपदीची भूमिका साकारली होती ती टीव्ही सिरीयल शिवाय अनेक बॉलीवूड आणि बंगाली चित्रपटांमध्ये देखील काम करताना दिसली आहे. रूपा एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती राजकारणामध्ये सक्रीय आहे. रूपा गांगुलीला धूम्र*पान करताना अनेक वेळा पाहिले गेले आहे.
मनीषा कोईराला
बॉलीवूड चित्रपट दिल से नंतर अभिनेत्री मनीषा कोईराला खूपच लोकप्रिय झाली होती. मनीषा कोईरालाला देखील सिगरेट पिताना स्पॉट केले गेले होता. कँसर मधून बाहेर आल्यानंतर तिने सिगरेटच्या सवयीमधून मुक्ती मिळवली.
माहिरा खान
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान सिगरेट देखील पिते. माहिरा खानला रणबीर कपूरसोबत न्यूयॉर्कच्या रस्त्यावर सिगरेट पिताना स्पॉट केले गेले होते. त्यावेळी माहिरा आणि रणबीरच्या अफेयरच्या चर्चा मोठ्या प्रमाणात झाल्या होता.
सुष्मिता सेन
मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचाही या यादीमध्ये समावेश होतो. सुष्मिता सेनला देखील सिगरेट पिण्याची सवय आहे. ती चित्रपटाच्या सेटवर आपले शुटींग संपवून सर्वात पहिला सिगरेट पिण्याचे काम करायची आणि तिला अनेक वेळा धुम्र*पान करताना पार्टीमध्ये पाहिले गेले होते.
करिश्मा तन्ना
करिश्मा तन्नाचा जन्म १९८४ मध्ये गुजराती कुटुंबामध्ये झाला होता. करिश्माने आपल्या करियरची सुरुवात क्योंकि सास भी कभी बहु थी सिरीयल मधून केली होती. टीव्ही जगतामधील या सुंदर अभिनेत्रीला देखील धुम्र*पान करण्याची सवय आहे. तिच्या हँडबॅगमध्ये नेहमीच सिगरेटचे पॅकेट असते.
सुमोना चक्रवर्ती
सुमोना चक्रवर्तीला तर तुम्ही चांगलेच ओळखत असाल. सुमोना सहावीत होती तेव्हा तिने आपल्या करियरची सुरुवात केली होती. तथापि तिला फिल्म इंडस्ट्रीमध्ये जास्त सफलता मिळाली नाही. ती छोट्या स्क्रीनवर खूप फेमस आहे. द कपिल शर्मा शो आणि याशिवाय तिने इतर अनेक कॉमेडी शोमध्ये काम केले आहे. सुमोना चक्रवर्तीला देखील धुम्र*पान करण्याची सवय आहे. असे म्हंटले जाते कि सिगरेटचे पॅकेट नेहमी तिच्या पर्समध्ये असते.