साउथ चित्रपटसृष्टीमध्ये असे बरेच सुपरस्टार अभिनेते आहेत जे नेहमी आपल्या चित्रपटामुळे चर्चेमध्ये राहत असतात. या चित्रपटसृष्टीत आपल्याला पती आणि पत्नी, मुलगा आणि वडील, आई आणि मुलगी अश्या जोडया पाहायला मिळतात. परंतु खूपच कमी लोकांना साउथच्या या सुपरस्टार्सच्या बहिणींबद्दल माहिती आहे. त्यांच्या या बहिणी नेहमी चित्रपटसृष्टीतील प्रकाशझोतापासून दूर राहिलेल्या आहेत. परंतु या सुंदरतेच्या बाबतीत बॉलीवूडच्या अभिनेत्रींनासुद्धा टक्कर देतात.
प्रभास आणि प्रगती उपलापती :- बाहुबली नावाने फेमस झालेल्या प्रभासची एक मोठी बहिण आहे जी दिसायला खूपच सुंदर आहे. तिचे नाव प्रगती उपलापती असे आहे. प्रगती फिल्म इंडस्ट्रीपासून नेहमी दूरच असते. प्रभास आणि प्रगतीची भावा-बहिणीची जोडी खूपच लोकप्रिय आहे. प्रभास आणि प्रगतीच्या आई-वडिलांचे नाव आहे उपलापती सूर्या नारायण राजू आणि सिवा कुमारी.वरुण तेज आणि निहारिका कोनिडेला :- साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात हँडसम अभिनेता वरुण तेजला त्याच्या फिदा या चित्रपटामुळे जास्त ओळखले जाते. वरुण तेजच्या बहिणीचे नाव निहारिका कोनिडेला असे आहे. निहारिकाचा जन्म १८ डिसेंबर १९९३ रोजी झाला होता. ती आता २६ वर्षांची आहे. निहारिकानेही अनेक चित्रपटामध्ये महत्वाची भुमिका साकारली आहे.महेश बाबू आणि मंजूला घट्टमनेनी :- साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक असलेल्या अभिनेता महेश बाबूच्या बहिणीचे नाव मंजूला घट्टमनेनी असे आहे. मंजूला चा जन्म १९७० मध्ये झाला होता. ती एक अभिनेत्री, निर्माता आणि दिग्दर्शक सुद्धा आहे. तर तिच्या पतीचे नाव संजय स्वरूप असे आहे. तिला एक मुलगादेखील आहे.राम चरण तेजा आणि चिरंजीवी सुश्मिता :- साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेता चिरंजीवीचा मुलगा राम चरण तेजाच्या बहिणीचे नाव चिरंजीवी सुश्मिता असे आहे. सुश्मिता खूपच सुंदर आहे. सुश्मिता हि फिल्म इंद्स्त्रीपासून लांब राहणेच पसंत करते.राणा दग्गुबत्ती आणि मालविका दग्गुबत्ती :- साउथ आणि बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेता राणा दग्गुबत्तीला बाहुबलीमधील भल्लालदेवाच्या नावाने ओळखले जाते. राणाच्या बहिणीचे नाव मालविका दग्गुबत्ती असे आहे. मालविका खूपच सुंदर आहे.ज्युनिअर एनटीआर आणि नंदमुरी सुहासिनी :- अभिनेता ज्युनिअर एनटीआर हा साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध अभिनेता आहे. मागच्या १७ वर्षांमध्ये फिल्म इंडस्ट्रीने बरेच चढ उतार पाहिले परंतु एनटीआरच्या स्टारडममध्ये काही खास बदल झाले नाहीत. ज्युनिअर एनटीआरची एक मोठी बहिण आहे जिचे नाव नंदमुरी सुहासिनी असे आहे. सुहासिनीचा जन्म ११ मार्च १९८१ रोजी हैद्राबाद येथे झाला होता. ज्युनिअर एनटीआरची बहिण फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे परंतु ती राजकारणामध्ये खूप सक्रीय आहे.