७० च्या दशकामधील प्रसिद्ध अभिनेत्री रीना रॉय आपल्या चित्रपटांपेक्षा आपल्या अफेयरमुळे जास्त चर्चेमध्ये राहिली. रीना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हाच्या प्रेमसंबंधाचे किस्सेतर जगजाहीरच आहेत. असे म्हंटले जाते कि शत्रुघ्न सिन्हाने लग्नानंतरहि रीना रॉयला बराच काळ डेट केले होते. ज्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये खूप समस्या निर्माण झाल्या होत्या.
या दोघांची प्रेम कहाणी १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या कालीचरण या चित्रपटादरम्यान सुरु झाली होती. या चित्रपटामध्ये दोघांनी एकत्र काम केले होते. दर्शकांनी त्यांच्या जोडीला खूप पसंती दिली होती. या दोघांनी जवळजवळ १६ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. विवाहित असून देखील शत्रुघ्न सिन्हा रीना रॉयच्या प्रेमामध्ये पडले होते. शत्रुघ्न सिन्हाची मुलगी सोनाक्षी सिन्हाचा चेहरा बऱ्याच प्रमाणात रीना रॉयच्या चेहऱ्यासारखा दिसतो.असे म्हंटले जाते कि रीना रॉय शत्रुघ्न सिन्हाच्या प्रेमामध्ये खूप वेडी झाली होती आणि ती नेहमी शत्रुघ्न सिन्हाला म्हणायची कि तुमच्या पत्नीला घटस्फोट देऊन तिच्यासोबत लग्न करावे. परंतु शत्रुघ्न सिन्हा आपल्या पत्नीला घटस्फोट देऊ इच्छित नव्हते.
शत्रुघ्न सिन्हाच्या जवळची पहलाज निहलानीने सांगितले कि १९८२ मध्ये रीना रॉयला एका चित्रपटाची ऑफर दिली होती तेव्हा रीनाने मला सांगितले कि माझ्या मित्राला जाऊन विचार मी त्याच्या उत्तराची वाट पाहत आहे. जर त्याचा होकार असेल तर मी त्यांच्या सोबत चित्रपटात काम करेन.
नाहीतर तर ८ दिवसांमध्ये लग्न करेन. जेव्हा हि गोष्ट पहलाज निहलानीने शत्रुघ्न सिन्हाला सांगितली तेव्हा ते फोनवर रडू लागले. यानंतर रीना रॉयने क्रिकेटर नौशीन खानसोबत लग्न केले. पण 2010 मध्ये सोनाक्षी सिन्हाची पहिली झलक पाहून शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय यांच्या वादग्रस्त प्रेमकथेच्या आठवणी पुन्हा एकदा लोकांच्या मनात ताज्या झाल्या.
वडिलांसाठी अशा गोष्टी ऐकून आणि रीना रॉयच्या लूकची तुलना करून सोनाक्षीही सुरुवातीला गप्प राहिली. पण पाणी डोक्यावरून गेल्यावर सोनाक्षीनेही आपले मौन तोडून लोकांना चोख प्रत्युत्तर दिले. सोनाक्षी म्हणाली, “मला वाटतं, मी जन्मलेही नव्हते तेव्हा हे घडलं होतं. जेव्हा मी मोठी होत होते आणि मला गोष्टी समजू लागल्या तेव्हा मला हे कळले. पण यासाठी मी माझ्या वडिलांना शिक्षा करणार नाही. हा त्यांचा भूतकाळ आहे. आणि प्रत्येकाचा एक भूतकाळ असतो. त्यामुळे मी त्याचा फारसा विचार करत नाही. तसेच मी त्याकडे लक्ष देत नाही. मी म्हटल्याप्रमाणे, ते फक्त काही लोकांसाठी आहे चांगले मथळे आणि रसाळ गप्पा बनत आहे. पण माझ्यासाठी ते माझे कुटुंब आहे.”
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.