बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी सोनाक्षी सिन्हा एक अभिनेत्री आहे, जी खूप लोकप्रिय आहे. सोनाक्षी सिन्हाने सलमान खानचा सुपरहिट चित्रपट दबंग मधून आपल्या फिल्मी करियरची सुरवात केली होती. आज ती बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. गेल्या काही काळापासून सोनाक्षी सिन्हा आपल्या लव्ह अफेयरमुळे खूपच चर्चेमध्ये आली आहे. अशामध्ये आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या त्या अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत ज्याला सोनाक्षी सिन्हा डेट करत आहे आणि लवकरच लग्न करू शकते. चला तर जाणून घेऊया त्या अभिनेत्याबद्दल.आम्ही ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत त्या अभिनेत्याचे नाव जहीर इकबाल आहे. जहीर इकबाल बॉलीवूड इंडस्ट्रीमधील एक हँडसम अभिनेता आहे. त्याने नोटबुक चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका बातमीनुसार सोनाक्षी सिन्हाने एका प्रमोशन दरम्यान सांगितले होते कि ती लवकरच लग्न करणार आहे. सोनाक्षी सिन्हाच्या या बोलण्यावरून असा अंदाज लावला जाऊ शकतो कि ती बॉयफ्रेंड जहीर इकबालसोबत लग्न करू शकते. सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबाल एकमेकांना खूप पसंत करतात. या दोघांना अनेक वेळा एकत्र फिरताना पाहिले गेले आहे.