श्रुति सेठ टीव्ही आणि चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री राहिली आहे. श्रुति सेठ भले सिरीयलमध्ये आपल्या दिसत नसेल पण सोशल मिडियावर ती खूप सक्रीय असते. श्रुति सेठने आपले करियर मुंबई येथील ताज हॉटेलमधून सुरु केले होते, जिथे ती एक गेस्ट रिलेशन एग्जीक्यूटिव होती.

तिचा मॉडेलिंगमध्ये येण्याचा कोणताही हेतू नव्हता. परंतु तिने योगायोगाने फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला पॉकेटमनीसाठी तिने मॉडेलिंग करण्यास सुरवात केली. त्यावेळी तिने बऱ्याच मोठ्या ब्रँडसाठी मॉडेलिंग केले होते. त्यानंतर ती टीव्ही इंडस्ट्रीकडे वळली. श्रुति सेठने चॅनल व्हीवर व्हीजे म्हणून काम करण्यास सुरवात केली.२००१ मध्ये तील “श्श्श… कोई है” मध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. यानंतर तिने देश में निकला होगा चांद, मान, क्यों होता है प्यार, कुछ कर दिखाना सारख्या सिरियल्समध्ये काम केले. तिला सर्वात जास्त लोकप्रियता शरारत या सिरीयल म्हणून मिळाली. श्रुती सेठने आमिर खानच्या फना चित्रपटामध्ये देखील भूमिका केली होती. त्या चित्रपटामध्ये काजोलच्या मैत्रिणीची भूमिका तिने साकारली होती.
श्रुती सेठने २०१२ मध्ये दिग्दर्शक दानिश असलमशी लग्न केले. २०१४ मध्ये तिने एका मुलाला जन्म दिला होता. श्रुती सोशल मिडीयावर तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखली जाते.