श्रीरामाने खालेले कंदमूळ म्हणून विकले जाणारे काप म्हणजे नेमके काय हे कळल्यावर धक्काच बसेल !

By Viraltm Team

Updated on:

रत्नागिरी अर्थात ज्योतिबा डोंगरावर कधी तुम्ही गेलात का? त्या डोंगरावर काही विक्रेते रामाने खाल्लेले कंदमूळ म्हणून भलामोठा खोडाचा भाग अस्सल कंदाचे काप विकत असलेले तुम्ही पाहिले असेल. ते काप म्हणजे नेमकं काय हे कधी तुम्ही विचार केलाय का? तर हे कंदमूळ वगैरे काय नसून आपल्याकडे आढळणाऱ्या वनस्पतीच्या खोडाचा भाग आहे.आपल्या गावाकडे येऊन अनेक लोक जोतिबाला जातात. यातील आपल्या अनेक पिढ्यांनी कंदमूळ खाल्ला असेल. श्रीराम प्रभू न खाल्लं म्हणून आपण खूप श्रद्धेने खाल्ल असेल. रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांना आणि माता सितेला तसेच लक्ष्मण यांना 14 वर्षे वनवास भोगावा लागला होता. वनवासात प्रभू रामचंद्र आणि सीता यांनी कंदमुळे खाऊन दिवस काढले असल्याचे विक्रेते सांगतात. त्यामुळे जत्रेमध्ये गेल्यावर लहान मुल हे काप हमखास आवडीने खातात. एवढं मोठं मूळ कोणत्या वनस्पतीचा असेल आपल्याला प्रश्न पडला असेल. तविक्रेते सांगतात की ते जंगलातील वनस्पतीचे मूळ आहे.

कोल्हापुरातल्या काही संशोधकांनी या सगळ्यावरचा पडदा उठला आहे. कोल्हापुरातील वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर विनोद शिंपले, डॉक्टर. निलेश पवार, डॉक्टर मानसिंग राजे निंबाळकर, यांना याबाबत शंका आली. नेमकं हे कोणत्या वनस्पतीचा मूळ आहे आणि हे खरंच शोधण्याचा उत्सुकतेपोटी त्यांनी प्रयत्न केला. विक्रेत्यांना विचारले असता हे मूळ आफ्रिकेतून आयात करण्यात आले आहे असे सांगण्यात आले.
संशोधकांनी कंद मूळ म्हणून विकल्या जाणाऱ्या विक्रेत्याकडून काही काप खरेदी केले. प्रयोगशाळेमध्ये या वनस्पतीची संरचना तपासली. त्यामुळे कोल्हापूर कंदमूळ म्हणून विकला जाणारा हा काप एकदल खोडाचा भाग असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पण कंदमूळ म्हणून विकले जाणारे वनस्पती बाहेरून आयात केलेली नसून आपल्याकडे माळरानावर आढळणारे केकताड किंवा घायपात ही वनस्पती आहे. या वनस्पतीपासून दोरखंड बनवले जात होते.
पण कंदमूळ म्हणून विकल्या जाणाऱ्या वनस्पती ची पूर्ण वाढ झाल्यानंतर तिला मधोमध एक बांबू सारखा कोंब येतो. त्याच्या टोकाला फुलोरा येऊन त्याला बीज लागतात या फुलातून बीज रुजून त्या झाडावर त्याची छोटी छोटी पिल्लं तयार होतात हे वनस्पतीची वैशिष्ट्ये आहे.

या अवस्थेत वरचा बांबू आणि बाजूचे पाने काढून टाकले जातात. त्यास कंदमुळांसारखा आकार देऊन त्यावर लाल रंगाची काव लावून तुम्हाला जमिनीतून काढलेला आहे असे भासवून त्याचे करून विक्री केले जाते. संशोधकाने अनोखी चाचणी करून या वनस्पतीच्या खोडाचा शोध घेतला डीएनए बारकोडींग पद्धतीचा वापर करण्यात आला. काप म्हणून विकले जाणार जेनेरिक नैसर्गिक रित्या गोड नसतात. त्यावर सॅकरीन टाकून ते गोड करण्यात येते. पण त्यामुळे ते काप अति प्रमाणात खाल्ल्यास अपायकारक ठरू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment