बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने ३ मार्चला आपला ३३ वा वाढदिवस साजरा केला. श्रद्धा कपूरचा बागी ३ चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. श्रद्धा कपूरने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आपली एक खास ओळख बनवली आहे . श्रद्धाने आपले करियर तीन पत्तीपासून सुरु केले होते जो २०१० मध्ये प्रदर्शित झाला होता. पण तिला आशिकी २ चित्रपटामधून सर्वात जास्त लोकप्रियता मिळाली.

या चित्रपटानंतर श्रद्धा कपूरने एक विलेन, बागी सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. तुम्हाला हे जाणून हैराणी होईल कि श्रद्धा कपूरच्या आईवडिलांनी पळून जाऊन लग्न केले होते. श्रद्धा कपूरची आई शिवांगी कपूर ८० च्या दशकामधील प्रसिद्ध अभिनेत्री होती.शक्ति कपूर आणि श्रद्धा कपूरची आई शिवांगी कपूरची पहिली भेट किस्मत चित्रपटाच्या सेटवर झाली होती. यादरम्यान ते एकमेकांना पसंत करू लागले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण श्रद्धा कपूरचे आजोबा या लग्नासाठी तयार नव्हते.
यामुळे शक्ति कपूर आणि शिवांगी कपूर यांनी पळून जाऊन लग्न केले. त्यावेळी शिवांगी फक्त १८ वर्षांची होती. लग्नानंतर शिवांगीने चित्रपटांमध्ये काम करने बंद केले. शिवांगी आणि शक्ति कपूरला दोन मुले आहेत. शक्ति कपूरच्या मुलाचे नाव सिद्धांत कपूर तर त्यांची मुलगी श्रद्धा कपूर आहे, जी आज एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.