शाहरुख खानने असा केला होता आपला पहिला पगार खर्च, मिळाले होते फक्त ५० रुपये !

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडचा किंग खान आज भलेही करोडो रुपये संपत्तीचा मालक आहे आणि फिल्म इंडस्ट्रीमधील एक चांगला उद्योगपती आहे परंतु एक काळ असा होता जेव्हा त्याने आपल्या करियरची सुरवात अगदी हालाखीच्या परिस्थितीमध्ये केली होती. नुकतेच रेमो डिसुजाचा शो डांस प्लसमध्ये आल्यानंतर शाहरुखने आपल्या पहिल्या पगाराबद्दल खुलासा केला आहे. या शोमध्ये शाहरुख खानचे स्वागत करण्यासाठी धर्मेश येलांडे, पुनीत पाठक, करिश्मा चव्हाण आणि सुरेश मुकुंदने शाहरुखच्या प्रसिद्ध गाण्यावर प्रस्तुती सादर केली होती.

ज्यामध्ये आई एम द बेस्ट, छैय्या छैय्या, ये दिल दीवाना, बादशाह, कुछ कुछ होता है, जब तक है जान आणि छम्मक छल्लो गाणी सामील करण्यात आली होती. बादशाह या चित्रपटापासून आपल्या फिल्मी करियरची सुरवात करणाऱ्या शाहरुखने फिल्म इंडस्ट्रीमध्ये २५ वर्षांपेक्षा अधिक काळ काम केले आहे.पण एक काळ असा होता कि जेव्हा शाहरुखने फक्त ५० रुपयेमध्ये आपल्या करियरची सुरवात केली होती. याबद्दल शाहरुखने सांगितले कि, त्याने या पगारामधून आपली कोणकोणती स्वप्ने पूर्ण केली होती. शाहरुख म्हणाला कि, मी माझ्या पहिल्या पगारामधून ताजमहाल बघायला गेलो होतो, जो फक्त ५० रुपये इतका होता. पण सर्व पैसे ट्रेनच्या तिकीटावरच खर्च झाले आणि जे शिल्लक राहिले होते त्यातून मी एक ग्लास कोल्ड ड्रिंक घेतले. त्यामध्ये एक माशी पडली होती, परंतु तरीही मी ते कोल्ड ड्रिंक प्यायलो आणि परतीच्या प्रवासामध्ये उलटी करत आलो.

आजकाल शाहरुखच्या आगामी चित्रपटाबद्दल खूप चर्चा होत आहे. एका वृत्तानुसार, शाहरुख खान राजकुमार हिरानीच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे, परंतु अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Leave a Comment