बॉलीवूडमध्ये सर्वात हिट जोडींपैकी शाहीद कपूर आणि मीरा राजपूतचे नाव घेतले जाते. या दोघांना एकत्र पाहणे लोकांना खूप आवडते. शाहीद आणि मीराची केमिस्ट्री देखील लोकांना खूपच आवडते. पण हे असे एक कपल आहे जे एकमेकांची टांग खेचण्यात देखील कोणतीही कसर सोडत नाही.
नुकतेच शाहीद कपूरने आपल्या पत्नीचा एक व्हिडीओ शेयर केला आहे जो पाहून असे वाटत आहे कि तो मीराच्या सवयीमुळे नाराज झाला आहे. याशिवाय नुकतेच मीराने सोशल मिडियावर आपला एक फोटो शेयर केला होता पण त्या फोटोवरून देखील शाहीदने तिला ट्रोल केले होते.
शाहीद कपूरने नुकताच एक व्हिडीओ शेयर करून पत्नीच्या सवयीचा खुलासा केला आहे. या व्हिडीओमध्ये शाहीद मीराच्या फोन वापरण्याच्या पद्धतीची खिल्ली उडवताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता कि मीराची नकल करताना शाहीद खूपच फनी चेहरा बनवतो जो पाहून तुम्ही देखील हसू लागाल. याआधी देखील शाहीदने अनेकवेळा मीराच्या फोन वापरण्याच्या सवयीची खिल्ली उडवली आहे.
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत नुकतेच सुट्ट्या घालवण्यासाठी गेले होते. दोघांचे अनेक फोटो समोर आले. या कपलने हे व्हेकेशन आपल्या लग्नाची सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल घेतले होते. एनिवर्सरीच्या निमित्ताने मीराने आपल्या युरोप ट्रीपचे फोटो शेयर केले होते ज्यामध्ये कपल बेंचवर बसलेले दिसत होते. तर शाहीदने देखील एक फोटो शेयर करून लिहिले होते कि ७ वर्षे पूर्ण झाली आहेत बेबी, हॅप्पी एनिवर्सरी. तू या ७ कठीण वर्षांना सोपे बनवलेस. तू एक सर्वाइवर एक लिजेंड आहेस.
शाहिद कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो जर्सी चित्रपटामध्ये शेवटचा पाहायला मिळाला होता. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत मृणाल ठाकूर देखील मुख्य भूमिकेमध्ये होती. चित्रपटामध्ये शाहीदचा अभिनय खूप पसंद केला गेला पण जर्सी बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दखवू शकला नाही.
शाहिदचे दोन चित्रपट पाइपलाइन मध्ये आहेत. राज आणि डीकेच्या दिग्दर्शनाखाली बनणारा फर्जी चित्रपट ज्यासोबत शाहीद ओटीटीवर डेब्यू करणार आहे. याशिवाय त्याच्याजवळ अली अब्बास जफरचा ब्लडी डॅडी देखील आहे.
View this post on Instagram
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.