ज्या शोची दर्शक आतुरतेने वाट पाहत होते तो शो आता लवकरच प्रदर्शित होणार आहे. करण जोहरचा कॉफी विथ करण हा शो लवकरच दर्शकांच्या भेटीला येणार आहे. ७ जुलैपासून हा शो प्रदर्शित केला जाणार आहे. शोचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
दरम्यान या शोमध्ये अनेक कलाकारांनी आपल्या पर्सनल आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. यामधील सर्वाधित चर्चेमध्ये आहेत ती म्हणजे साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेत्री समांथा रुथ प्रभू. समांथाने देखील या शोमध्ये हजेरी लावली आहे.
समांथाने आजवर तिच्या घटस्फोटाबद्दल बोलणे टाळले होते. पण या शोमध्ये तिने उघडपणे खुलासे केले आहेत. तिने आपल्या मनातील सर्व काही बोलून दाखवले आहे. साऊथमधील दिग्गज अभिनेत्री समांथाने साऊथ फिल्म इंडस्ट्रीच नाही तर बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील आपले स्थान भक्कम केले आहे.
काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि तिचा पती अभिनेता नागा चैत्यन्य हे घटस्फोट घेऊन वेगळे झाले आहेत. हि जोडी फिल्म इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध जोडी मानली जात होती. पण त्यांनी ज्यावेळी घटस्फोटाची घोषणा केली तेव्हा त्यांच्या चाहत्यांना खूपच मोठा धक्का बसला होता.
पण नंतर दोघांनीहि त्यांच्या घटस्फोटावर बोलणे टाळले होते. कॉफी विथ करण शोमध्ये आल्यानंतर समांथाने तिचे वैवाहिक आयुष्य निराशाजनक असल्याचे सांगितले आहे. यावर ती पुढे म्हणाली कि आपल्या दुखी वैवाहिक आयुष्याला आपण स्वतःच कारणीभूत असतो.
आपण आपल्या आयुष्याला K3G म्हणतो पण रियलमध्ये ते KGF सारखे असते असे देखील समांथा म्हणाली. समांथाच्या या बोलण्यावर करणने त्यावर स्मित हास्य दिले. घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर समांथाने या विषयावर कधीच भाष्य केले नाही.
पण आता तिने यावर सूचकपणे भाष्य केले आहे. करणच्या या शोमध्ये अनेक कलाकार हजार लावत असतात ज्यामध्ये ते आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफबद्दल अनेक खुलासे करत असतात. यावेळी समांथाच नाही तर अनन्या पांडे, सारा खान, कतरिना, विकी कौशल, आलिया भट्ट, अक्षय कुमार हे दिग्गज कलाकार देखील सामील होणार आहेत.