सलमान सोबत चित्रपटामध्ये काम करताना पाहायला मिळणार हि २९ वर्षांची साउथची प्रसिद्ध अभिनेत्री !

By Viraltm Team

Published on:

सलमान खानच्या चित्रपटांबद्दल त्याच्या फॅन्समध्ये चांगलीच क्रेझ असते, त्याचे स्टारडम सुद्धा खूपच उत्कृष्ठ आहे. त्याचे येणारे चित्रपट करोडोमध्ये कमाई करतात. यावर्षी म्हणजेच २०२० मध्ये सलमान खानने आपल्या एका चित्रपटाची घोषणा केली आहे आणि तो चित्रपट आहे राधे. याशिवाय याचवर्षी त्याने २०२१ चे सुद्धा नियोजन केले आहे.

सलमानने २०२१ साठी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे आणि त्या चित्रपटाचे नाव कभी ईद कभी दिवाली असे आहे. काही दिवसांपूर्वी सलमानने आपल्या या चित्रपटाची घोषणा एका ट्वीटद्वारे केली होती. एका माहितीनुसार पूजा हेगडे या चित्रपटामध्ये सलमानची हिरोईन म्हणून पाहायला मिळणार आहे. पूजा हेगडे हाऊसफुल ४ या चित्रपटामध्ये शेवटची पाहायला मिळाली होती. पूजा हेगडेला चित्रपटामध्ये घेण्याची पुष्टी स्वतः चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियावाल यांनी केली आहे.निर्माते साजिद नाडियावालने एका इंटरटेनमेंट पोर्टलला मुलाखत दिली होती. ज्यामध्ये त्यांनी सांगितले होते कि हाउसफुल ४ मध्ये पूजासोबत काम केल्यानंतर त्यांना वाटले कि ती त्यांच्या आगामी चित्रपटासाठी ती योग्य आहे. त्यांनी म्हंटले कि पुजाची स्किन प्रेजेंस खूपच उत्कृष्ठ आहे आणि सलमानसोबत तिची जोडी खूपच सुंदर दिसेल. हि कथेमध्ये नाविन्य आणण्यास मदत करेल.एका माहितीनुसार पूजा या चित्रपटामध्ये एका गावातील मुलीची भूमिका साकारणार आहे. तसे तर यापूर्वीही तिने साउथच्या अनेक चित्रपटांमध्ये अशा भूमिका साकारल्या आहेत. पूजा हेगडेच्या वर्कफ्रंट बोलायचे झाले तर २०२० मध्ये तिचा मोस्ट एलिजिबल बॅचलर आणि जान नावाचे दोन तेलुगु चित्रपट येत आहेत.

Leave a Comment