अभिनेत्री सना खान बऱ्याच काळापासून चर्चेमध्ये राहिली आहे. तिचे तिचा बॉयफ्रेंड मेलविन लुइससोबत दीर्घकाळानंतर ब्रेकअप झाले होते. पण गेल्या काही काळापासून ती आपल्या बॉयफ्रेंडवर अनेक प्रकारचे आरोप करून चर्चेमध्ये आली आहे. नुकतेच सना खानने खुलासा केला आहे कि तिचा बॉयफ्रेंड तिच्यावर संशय घेत होता आणि तिला सलमानपासून दूर ठेवत होता.सना खानने एका इंटरटेनमेंट वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना सांगितले कि तिचे आणि सलमानचे नाते खूपच सुंदर आहे, सलमान तिला नेहमी सन्मानाने वागवतो. तिने पुढे हे देखील सांगितले कि तिला जेव्हा पाहिजे तेव्हा ती सलमानला राखी बांधू शकते आणि सलमानचा भाऊ सोहेलसोबतसुद्धा तिचे संबंध चांगले आहेत.सनाने तिच्या आणि लुईसच्या नात्याबद्दल बोलताना म्हणाली कि, त्याच्या मनामध्ये नेहमी एकाच प्रकारची गोष्ट असायची. तिने सांगितले कि तिला एकदा जुम्मे की रात या गाण्यावर परफॉरमंस द्यायचा होता, तेव्हा लुईस तिला अनेक प्रश्न विचारू लागला आणि खोटे बोलण्याचा आरोप देखील लावला. आपल्या माहितीसाठी सांगतो कि २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या सलमानच्या जय हो या चित्रपटामध्ये सना पाहायला मिळाली होती. याआधी ती बिग बॉसमध्येसुद्धा पाहायला मिळाली होती, ज्याचा होस्ट सलमान खान आहे.काही काळ सना खानने लुईसवर सोशल मिडियावरील एका पोस्टमधून गंभीर आरोप लावले होते. तिने लिहिले होते कि, मला हे जाणून खूप दुख झाले होते कि त्याने एका लहान मुलीला प्रेग्नंट केले होते. तो मुलींकडून पैसे घेत होता, तो आपल्या स्टुडंटसोबत फ्लर्ट करायचा. यावरून हे सिद्ध होते को कसा टीचर आहे. या सर्व गोष्टींनी मला घाबरवून सोडले होते. यामुळे तो अजूनपर्यंत स्ट्रगल करत आहे. देव तुला शिक्षा करेल. याशिवाय सनाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते कि तो खोटारडा आहे आणि तो जो काही करत असतो तो फक्त प्रसिद्धी साठीच करत असतो, त्याने मला फसवले आहे.