सैफ आली खान आणि अमृता सिंहचा घटस्फोट होऊन १६ वर्षे उलटली आहेत. या दोघांनी १९९१ मध्ये एकमेकांच्या संमतीने लग्न केले होते. परंतु २००४ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटाच्या अनेक वर्षानंतर सुद्धा सैफ आली खानला एक गोष्ट खूप त्रास देते. ज्याचा खुलासा त्याने नुकतेच एका मुलाखतीदरम्यान केला आहे. त्याने या मुलाखतीमध्ये भाऊक होऊन म्हंटले कि हि जगातील सर्वात वाईट गोष्ट आहे.

सैफ ने आपल्या आणि अमृताच्या घटस्फोटाबद्दल म्हंटले कि – हि जगातील सर्वात वाईट गोष्ट आहे. हि एक अशी गोष्ट आहे कि ज्याच्याबद्दल मी म्हणतो कि हे खूप वेगळे असते. मला नाही वाटत कि मी कधीही या गोष्टीबद्दल बरा होईन. काही अशा गोष्टी आहेत ज्या याबाबतीत मला शांत राहू देत नाहीत.सैफ आली खान पुढे म्हणाला कि त्यावेळी मी फक्त २० वर्षांचा होतो. आज बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. तुमची इच्छा असते कि तुमचे आईवडील नेहमी तुमच्या सोबत राहावेत. परंतु ते दोघेही स्वतंत्र आहेत. म्हणूनच आजकाल कोणीही मॉडर्न रिलेशनशिपशी सहमत होऊ शकतो.
जेव्हा सैफला विचारले गेले कि याचा इब्राहिम आणि सारावर काय परिणाम होईल तेव्हा त्याने उत्तर दिले कि कोणत्याही मुलाला त्याच्या कुटुंबापासून सहजपणे वेगळे करू नये. यामुळे मुलांवर वेगळा परिणाम होतो. अनेक वेळा परिस्थिती खूप वेगळी असते. पेरेंट्स जर सोबत नसतील आणि बऱ्याच तक्रारी असतील तर अशामध्ये मुलांसाठी ते खूप अवघड असते. सैफने एकदा मुलाखतीमध्ये हे देखील सांगितले होते कि मी जेव्हा २० वर्षांचा होतो तेव्हा मी लग्न केले होते. मी काही गोष्टींसाठी अमृताला श्रेय देऊ शकतो जिने माझ्या कुटुंब, काम आणि बिजनेसबद्दल गांभीर्य शिकवले.