खूपच बदलल्या आहेत सब टीव्ही वरील या ७ बालकलाकार, नंबर ७ ला ओळखणे देखील आहे कठीण !

By Viraltm Team

Published on:

टीव्ही जगतामध्ये एकापेक्षा एक प्रसिद्ध कलाकार आहेत ज्यांचे अनेक चाहते आहेत, पण या कलाकारांसोबत अनेक बालकलाकार देखील आहेत जे लोकांमध्ये खूपच फेमस झाले आहेत पण काळानुसार हे बालकलाकार मोठे झाले आहेत आणि त्यांच्या लुकमध्ये खूपच बदल झाला आहे. अशामध्ये आज आम्ही तुम्हाला सब टीव्हीवरील त्या बालकलाकारांबद्दल सांगणार आहोत जे आता खूपच बदलले आहेत.

निधि भानुशाली :- सब टीव्ही वरील प्रसिद्ध शो तारक मेहता का उल्टा चश्मा मध्ये सोनालिका भिडेची भूमिका साकारणारी २० वर्षीय निधी भानुशाली आता खूपच बदलली आहे. या शोमध्ये तिने ८ वर्षे काम केले होते.श्रुति बिष्ट :- २०११ मध्ये चिंटू चिंकी आणि एक बड़ी सी लव स्टोरी मध्ये श्रुति बिष्टने पिंकीची भूमिका साकारली होती. या शोशिवाय ती सब टीव्हीवरील शो बालवीरमध्ये काम करताना पाहायला मिळाली होती. १७ वर्षीय श्रुति बिष्ट आता खूपच बदलली आहे.झील मेहता :- निधी भानुशालीच्या अगोदर तारक मेहता का उल्टा चश्मा मध्ये झील मेहताने सोनालिका भिडेची भूमिका साकारली होती. शोमध्ये तिने ४ वर्षे काम केले होते आणि नंतर ती टीव्ही जगतापासून दूर गेली.हिबा नवाब :- टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेती हिना नवाबने बाल कलाकार म्हणून आपल्या करियरची सुरवात केली होती. २००९ मध्ये तिने सब टीव्हीवरील शो लो हो गई पूजा इस घर की मध्ये काम केले आणि आज २३ वर्षीय हिबा जीजा जी छत पर है मध्ये मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे.सिमरन नाटेकर :- वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी अभिनय करियरची सुरवात करणारी सिमरन नाटेकरने २०११ मध्ये सब टीव्ही शो तोता वेड्स मैनामध्ये काम केले होते. आज तिचे वय २२ वर्षे आहे आणि ती खूपच बदलली आहे.अनुष्का सेन :- टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री अनुष्का सेनने २०१२ मध्ये बालवीर या शोमध्ये मेहरची भूमिका साकारली होती. या शोमध्ये तिचा अभिनय खूपच पसंत केला गेला होता. १७ वर्षीय अनुष्का सेनने या शो शिवाय इंटरनेट वाला लव आणि झांसी की रानी या शोमध्ये देखील काम केले आहे.नूपुर भट्ट :- सब टीव्ही वरील २०११ चा कॉमेडी शो आर. के. लक्ष्मण मध्ये लता वसावड़ाच्या भूमिकेमधून प्रसिद्ध मिळवणारी नूपुर भट्ट आता २४ वर्षांची झाली आहे आणि आता ती खूपच बदलली आहे आणि तिला ओळखणे देखील खूप कठीण आहे.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment