मागील ८ वर्षात ७ सिनेमे फ्लॉप तरीही आलिशान प्लॅट कसे विकत घेतले? याचा रिया ने केला मोठा खुलासा !

By Viraltm Team

Published on:

अभिनेता सुशांतसिंहने आपल्या मुंबई येथील बांद्रा स्थित प्लॉटमध्ये आ*त्म*ह*त्या केली. त्यानंतर सुशांत सिंहाच्या वडिलांनी रियावर बिहार येथील पटना येथे पोलीस स्टेशनला एफ आय आर फाडून तक्रार नोंदवली. तसेच बिहार सरकारने सुशांत सिंह आ*त्म*ह*त्या प्रकरणात सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. ती शिफारस केंद्र सरकारने मान्य करून रिया विरोधात सीबीआय चौकशी चालू केली आहे. सुशांत सिंहाच्या वडिलांनी रिया वरती आरोप केला होता की सुशांत सिंह च्या बँक अकाउंट मधील 17 कोटी रुपयांची अफरातफर केली आहे. त्यामुळे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी ने तक्रार नोंदवून चौकशी चालू केली आहे.रियाची कौटुंबीक व व्यवसायीक पार्श्वभूमी पाहता रियाचे वडील आर्मी डॉक्टर असून आई गृहिणी आहे. रियाला एक भाऊ असून त्याचं नाव शोविक आहे. सुरुवातीच्या काळामध्ये रिया अनेक कार्यक्रम टीव्ही शो होतं करत होती. त्याच वेळेस तिचे इंजीनियरिंग शिक्षण घेत होती. परंतु तिला अभिनय क्षेत्रात पदार्पण करायचे असल्यामुळे इंजिनिअरिंगचे शिक्षण रियाने अर्ध्यात सोडले.

सन 2012 मध्ये तेलुगू चित्रपट तूनीगा तूनीगा तून चित्रपट स्रष्टीत रिया ने पदार्पण केले. परंतु पदार्पणातच तिचा चित्रपट फ्लॉप झाला. सन 2013 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बॉलिवूडमधील रियाचा “मेरे डॅड की मारुती” हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. पण हा बॉलीवूडमधील पहिला चित्रपटही फ्लॉप झाला. सन 2014 मध्ये सोनाली केबल या चित्रपटात रियाने काम केले. हा हि तिचा चित्रपट फ्लॉप झाला. त्यानंतर रियाने तीन वर्षे विश्रांती घेत सन 2017 मध्ये “हाफ गर्लफ्रेंड” आणि “दोबारा सी योर इव्हील” या सिनेमांमध्ये दुय्यम भूमिका मिळाल्या तरीही ते सिनेमे फ्लॉप ठरले. यानंतर आलेल्या “बँक चोर”,” जिलेबी” या सिनेमात रिया ने लीड एक्टरेस म्हणून काम केले परंतु ते सिनेमे ही बॉलीवूड वर करिष्मा दाखवू शकले नाहीत. सन 2012 ते 2020 या काळात रियाने ७ सिनेमे केले परंतु एकही सिनेमा तिचा हिट झाला नाही.

परंतु मागील दोन वर्षात रियाचे इन्कम टॅक्स रिटर्न बघितले असेल तिचे वार्षिक उत्पन्न 10 ते 14 लाखांच्या आसपास आहे. मुंबईमध्ये कोट्यवधीची संपत्ती आहे. मुंबईत तिचे 2 आलिशान फ्लॅट आहेत. सुशांत सिंहच्या वडिलांनी आरोप केला होता की सतरा कोटीची अफरा तफर रियाने केलेली असल्याने तिची चौकशी व्हावी. त्यामुळे ई डी ने 7 ऑगस्ट रोजी रियाची आठ तास कसून चौकशी केली. त्यावेळेस रियाने तिच्या संपत्ती विषयी खुलासा केला आहे.विकत घेतलेली सर्व प्रॉपर्टी स्वतःच्या कमाईतून विकत घेतल्याचे रियाने ई डी समोर सांगितले. रियाने शुक्रवारी झालेल्या या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला आहे. रियाच्या मुंबई येथील दोन फ्लॅटची देखील चौकशी केली. हे सुशांत सिंह राजपूत च्या बँक खात्यातील काढलेल्या पैशातून घेतले असल्याचा आरोप करण्यात आला होता. चौकशीमध्ये दोन्ही प्लेट्स मी स्वतः घेतले आहेत असं उत्तर रियाने इंडिया टुडे या वृत्तात म्हटले आहे
मुंबई येथील खार येथील उच्चभ्रू वस्तीमध्ये दोन फ्लॅट असून त्यापैकी एका फ्लॅटची जवळपास 85 लाख रुपये किंमत असून त्यासाठी रियाने 25 लाखाचे डाऊन पेमेंट केले होतं. तर ६० लाखाचा गृहकर्ज घेतलं होतं. हा फ्लॅट 550 स्क्वेअर फुटाचा आहे. दुसरा फ्लॅट 2012 मध्ये विकत घेतला असून त्याचा ताबा सन 2016 मध्ये मिळाला आहे. ह्या फ्लॅटची किंमत जवळपास 60 लाख रुपये आहे. दरम्यान रियाचे चे वार्षिक उत्पन्न 15 ते 17 लाख रुपये असून, गेली ८ वर्षात ७ सिनेमे फ्लॉप असताना इतक्या किमतीचे फ्लॅट रियाने कसे विकत घेतले. याचा खुलासा रियाला ई डी समोर करावा लागला.मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment