बॉलीवूड अभिनेता ऋषि कपूर चित्रपटांशिवाय सोशल मिडीयावर नेहमी सक्रीय असतात. ते नेहमी आपल्या चाहत्यांसाठी फोटो किंवा व्हिडिओ शेयर करत असतात. ऋषि कपूर यांनी नुकतेच शेयर केलेल्या एका फोटोमुळे ते पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले आहेत. ऋषि कपूर यांनी शेयर केलेला हा फोटो त्यांच्या बालपणीचा आहे. या फोटोमध्ये ते बॉलीवूडची प्रसिद्ध गायिका लता मंगेशकरच्या हातामध्ये पाहायला मिळत आहेत. ऋषि कपूरने या फोटोसोबत खूप चांगले कॅप्शन देखील लिहिले आहे.

ऋषि कपूर आणि लता मंगेशकर यांचा हा फोटो ऋषि कपूर यांच्या बालपणीचा आहे. या फोटोसोबत ऋषि कपूर यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि नमस्ते लता जी! तुमच्या आशीर्वादाने बघा मला दोन किंवा तीन महिन्याचा माझा एक फोटो मिळाला. तुमचा माझ्यावर नेहमी आशीर्वाद राहिला आहे. खूप खूप धन्यवाद! मी हा फोटो ट्विटरवर शेयर करून जगाला हे सांगू शकतो का कि, हा एक खूप मौल्यवान फोटो आहे.ऋषि कपूरच्या या फोटोवर लता मंगेशकर यानी खूपच खास अंदाजामध्ये रिप्लाय दिला आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले कि, नमस्कार ऋषि जी, हा फोटो पाहून मला खूपच आनंद झाला. मला हा फोटो नाही मिळाला. हा फोटो पाहून मी राज भाई (राजकपूर) आणि कृष्णा (राजकपूर ची पत्नी) यांना खूप आठवत आहे. हा फोटो घेण्यापूर्वी वहिनींनी तुम्हाला माझ्या हातामध्ये दिले होते. तुम्ही हा फोटो सर्वांसोबत शेयर केलात खूप चांगले वाटले. तुमचे आरोग्य नेहमी चांगले राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
सोशल मिडीयावर लता मंगेशकर आणि ऋषि कपूर यांचा हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. या दोघांचेही चाहते या फोटोवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. विशेष म्हणजे ऋषि कपूर सोशल मिडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात. ते जास्तकरून प्रत्येक सामाजिक प्रश्नावर आपले मत व्यक्त करत असतात. त्यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास ऋषि कपूरचा ‘द बॉडी’ चीतपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत इमरान हाशमी सुद्धा आहे. चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक केले जात आहे. बॉलीवूडचे दिग्गज अभिनेता असलेले ऋषि कपूर यांनी एक बालकलाकार म्हणून बॉलीवूडमध्ये एंट्री केली होती. मेरा नाम जोकर या चित्रपटानंतर त्यांनी बारात, जहरीला इंसान, अमर अकबर ऐंथनी सारख्या जबरदस्त चित्रपटांमध्ये काम केले.