अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांचा मोहरा चित्रपट तर आपल्या सर्वांना चांगलाच माहिती असेल. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या मोहरा चित्रपटामधील टिप टिप बरसा पाणी हे गाणे आजदेखील लोकांना खूपच आवडते. या गाण्याचे शुटींग ४ दिवस चालले होते. अक्षय कुमार आणि रविना टंडन यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले होते. रविनाने सांगितले कि या गाण्याच्या शुटींग दरम्यान माझ्या पायामध्ये बारीक दगड घुसले होते. शुटींगसाठी टाकीच्या पाण्याचा वापर करण्यात आला होता जे खूपच थंड होते.

यामुळे मला सर्दी आणि ताप झाला होता. रविनाने सांगितले कि माझे पूर्ण शरीर तापाने फणफणत होते आणि मी एकसारखी मध आणि अदरकचा चहा पित होते. माझे पाय खालून सोलून निघाले होते आणि त्यादरम्यान माझे पीरियड्स सुद्धा चालू होते. माझ्यासाठी हे सर्व करणे खूपच अवघड होते. पण त्यावेळी हे गाणे खूपच लोकप्रिय झाले होते. आजहि हे गाणे लोकांच्या तोंडामधून ऐकायला मिळते.या गाण्यामध्ये रविनाने पिवळी साडी परिधान केली होती आणि अक्षय कुमार सोबत रोमँटिक डांस करताना पाहायला मिळाली होती. या गाण्यामधील दोघांच्या अभिनयाचे खूपच कौतुक झाले होते. एका मुलाखती दरम्यान अक्षय कुमारने सांगितले कि, आम्हाला या गाण्याबद्दल जास्त काही माहिती नव्हते. फक्त कोरियोग्राफर जसे सांगेल तसे आम्ही करत होते. असेच टिप टिप बरसा पाणी या गाण्याच्या दरम्यान झाले होते.
चित्रपटाचे बजट कमी असल्यामुळे अनेक वेळा आम्ही कॉस्टयूमसुद्धा चेंज करत नव्हतो. पुन्हा एकदा हे गाणे आपल्याला अक्षय कुमारवर चित्रित झालेले पाहायला मिळणार आहे. या गाण्याचे शुटींग देखील पूर्ण झाले आहे. परंतु या गाण्यामधील हिरोईन रविना टंडन नसून कॅटरीना कैफ आहे.