रश्मी देसाईच नव्हे तर हे कलाकार देखील झाले आहेत डिप्रेशनचे शिकार, एक तर शो मध्ये रडू लागली होती !

By Viraltm Team

Published on:

टीव्ही जगतामधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉस १३ ची कंटेस्टेंट राहिलेली अभिनेत्री रश्मी देसाईने आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोठा खुलासा केला आहे. रश्मी देसाईने आपला पूर्व पती नंदीशबद्दल मुलाखतीमध्ये अनेक खुलासे केले आहेत. रश्मीने सांगितले कि तिचे शारीरिक शोषण आणि घटस्फोटानंतर ती डिप्रेशनचा शिकार झाली होती. अभिनेत्री रश्मी देसाईच्या आधीही अनेक अभिनेत्री आहेत ज्या डिप्रेशनच्या शिकार झाल्या आहेत. अशामध्ये आज आम्ही अशा अभिनेत्रींच्याबद्दल सांगणार आहोत ज्यांनी डिप्रेशनचा सामना केला आहे.बॉलीवूड अभिनेत्री सना खान काही काळापूर्वी बॉयफ्रेंडसोबतच्या ब्रेकअपमुळे खूपच चर्चेमध्ये राहिली होती. तिने सोशल मिडियावर आपल्या ब्रेकअपबद्द्द्ल वक्तव्य केले होते आणि सांगितले होते कि ती ब्रेकअप नंतर डिप्रेशन मध्ये गेली होती. पण आता ती हळू हळू ठीक होत आहे. तिने सांगितले कि गेल्या २० दिवसांपासून ती झोपेच्या गोळ्या खात आहे. पण आता २ दिवसांपासून तिने गोळ्या घेतलेल्या नाहीत.
बॉलीवूडची मस्तानी दीपिका पादुकोणसुद्धा डिप्रेशनची शिकार झाली होती. तिने स्वतः सांतिगले कि २०१४ मध्ये मी डिप्रेशनमध्ये गेले होते. बऱ्याच काळापर्यंत काम केल्यामुळे ती बेशुद्ध झाली होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी उठले तेव्हा मला खूप रडू वाटत होते.परिणीती चोप्राने एका टॉक शोमध्ये सांगितले की २०१४ ते २०१५ दरम्यान ती खूपच कठीण परिस्थितीतून गेली आहे. मला असे वाटत होते कि आता सर्व दरवाजे बंद झाले आहेत. काहीहि चांगले होण्याची अपेक्षा नव्हती. मी खूपच वाईट रीतीने डिप्रेशनमध्ये गेले होते.
प्रसिद्ध सिंगर नेहा कक्कडचे जेव्हा हिमांश कोहलीसोबत ब्रेकअप झाले होते तेव्हा ती डिप्रेशनमध्ये गेली होती. यामुळे तिला अनेक रियालिटी शोमध्ये रडताना आपण पाहिले असेल.

Leave a Comment