आपल्या को-स्टारवर झाले होते प्रेम आणि केले होते लग्न, काही वर्षातच झाला घटस्फोट !

By Viraltm Team

Published on:

रश्मी देसाई बिग बॉस १३ ची उत्कृष्ठ स्पर्धक आहे आणि तिने अंतिम फेरी गाठली आहे, रश्मीने बिग बॉसच्या घरामध्ये स्वतःला सिद्ध केले आहे आणि ती एक उत्कृष्ठ खेळाडू म्हणून समोर आली आहे. बिग बॉस मध्ये दिसणारी अभिनेत्री रश्मी देसाई हिचा नुकताच वाढदिवस झाला आहे. तिचा जन्म १३ फेब्रुवारी १९८६ रोजी आसामच्या नागाव मध्ये झाला होता. अभिनेत्री रश्मी देसाईने वयाच्या १९ व्या वर्षी आपल्या करियरची सुरवात केली होती.

रश्मी देसाईने २००२ मध्ये असमिया या चित्रपटामधून आपल्या करियरची सुरवात केली होती. या चित्रपटामध्ये तिची खूपच छोटी भूमिका होती आणि तिला काही खास नोटीस केले गेले नाही. त्याचबरोबर तिने अनेक टीव्ही शोमध्ये देखील काम केले आहे. टीव्ही सिरीयल उतरन मधील तपस्याच्या भूमिकेने तिला प्रत्येक घरा-घरामध्ये ओळख निर्माण करून दिली. याशिवाय रश्मीने अनेक इतर टीव्ही सिरीयलमध्ये काम केले. या शोदरम्यान तिचे आपल्या को-स्टार वर प्रेम जुळले आणि २०१२ मध्ये तिने नंदिश संधू सोबत लग्न केले.लग्नाच्या काही वर्षातच तिच्या विवाहित जीवनामध्ये तणाव निर्माण होण्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आणि ४ वर्षानंतर तिचे लग्न तुटले. यानंतर दोघांनी नच बलिए ७ मध्ये आपले रिलेशन सुधारण्याचे प्रयत्न केले होते. शोमध्ये त्यांची ट्यूनिंग चांगली जमली होती. या रियालिटी शोच्या दरम्यानच रश्मीने आपल्या मिसकैरेजचा खुलासा केला होता. यानंतर शेवटी दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा घटस्फोट झाला.
बातमीनुसार रश्मी एका एंटरटेनमेंट पोर्टलशी बोलताना म्हणाली होती कि, ज्या काही गोष्टी समोर आल्या त्या नंदिशच्या बाजूने होत्या. मी बराच काळ स्वतःला रोखून ठेवले. मला वाटत होते कि कोणालाही खुलासा द्यायची गरज नाही. पण आता मला बोलायचे आहे. मला कधीच घर सोडायची इच्छा नव्हती. मला नेहमीच घरातून बाहेर काढले जायचे.जर तो आमच्या या नात्याला १०० टक्के देत होता तर आमच्यामध्ये तणाव निर्माण झाले नसते. मला कधीच त्याच्या मैत्रिणींपासून त्रास झाला नाही. मी कधीच त्याच्यावर संशय घेतला नाही. मी माझ्या कामात आणि प्रवासामध्ये खूप व्यस्त असायचे. मला माहित नाही कि तो कोणाला डेट करत आहे का नाही. जर तो करत असेल तर त्यांने एंज्वॉय करावे. मी त्याच्या चांगल्या भविष्यासाठी शुभेच्छा देते.

Leave a Comment